Saturday, June 20, 2026
SportsTOP NEWS

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा पराभव

एडिलेड – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची दाणादाण उडाली. फक्त १९ धावात भारताचे सहा फलंदाज बाद झाले. भारताने कालच्या १ बाद ९ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. काल भारताने ऑस्ट्र्लियाला १९१ धावांवर रोखले होते आणि ५३ धावांची महत्त्वाची आघाडी घेतली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने कसोटीवर पकड मिळवली होती. पण आत भारताने पराभवाचा पाया रचण्याची सुरुवात केली.

मयांक अग्रवाल आणि नाइट वॉचमन जसप्रीत बुमराह खेळण्यास आले. बुमराह २ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. त्यानंतर सलामीवीर मयांक अग्रवाल ९ धावा करून बाद झाला. पहिल्या डावात देखील त्याला धावसंख्या उभा करता आली नाही. मयांक बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ४ बाद १५ अशी होती आणि मैदानावर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे मैदानावर होते.
ही जोडी भारताचा डाव सावरेल असे वाटत होते. पम अजिंक्य शून्यावर बाद झाला. त्यानंतर सर्व मदार विराट कोहलीवर होती. पण तो देखील चार धावा करून माघारी परतला. विराट बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ६ बाद १९ अशी झाली. त्यानंतर वृद्धीमान साहा ४ धावा, तर दुसऱ्याच चेंडूवर अश्विनला जोश हेजलवूडने बाद केले आणि भारताची अवस्था ८ बाद २६ अशी केली.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात भारताची सर्वात कमी धावसंख्या ४२ इतकी आहे. या ४२ धावसंख्येपर्यंत पोहोचायचे असेल तर भारताला अजून मोठी मजल मारावी लागणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading