“द ग्रीड लोभ” चे गाणे झाले आऊट
श्रेयशी चौधरी निर्मित चित्रपट “द ग्रीड लोभ” हा चित्रपट एक सामान्य माणसाच्या अवती भवती फिरनारी कथा आहे, आणि जास्त पैसे कमावण्यासाठी व आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसे चुकीचे मार्ग निवडतो, ते ह्या चित्रपटात दर्शविले आहे.
अभिनेता सुमित चौधरी आणि निर्मिती श्रेयाशी चौधरी ह्या चित्रपटा द्वारे पदार्पण करत आहे.
नुकतेच चित्रपटली गाणी हंगामा म्युझिक द्वारे रिलीझ केले गेले आहे. आणि आता पहिले व्हिडिओ गाणे परफेक्टिओ एंटरटेनमेंटच्या यूट्यूब वाहिनीवर प्रसिद्ध झाले आहे. शीर्षक गीत सुमित चौधरी यांनी लिहिले आहे आणि नितेश श्रीवास्तव यांनी आवाज दिला आहे. नितीश श्रीवास्तव आणि पुनीत अवस्थी ह्यांनी ह्या गाण्याला कंपोज केले आहे.
चित्रपटात सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी एक सखोल संदेश आहे तर त्यात यश आणि परिश्रमांचा खरा अर्थ सांगितला आहे. या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत आणि ती सर्व प्रेरक, प्रेम आणि भावनाप्रधान आहे. निर्माता आणि दिग्दर्शक यांनी संगीतावर लक्ष केंद्रित केले आहे.
