Thursday, September 3, 2026
PUNE

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांनाच्या प्रश्नांवर धरणे आंदोलन

पुणे, दि. १७ – केंद्र सरकार ने लॉकडाऊन काळात शेती संबधी तीन नवीन कायदे चर्चा न करता संसदेत असलेल्या संख्या बळाच्या आधारावर मंजुर करुन घेतले.या नवीन विधेयकामुळे भारतीय शेतकरी अक्षरशः नागवला जाणार असुन तो देशोधडीला लागणार आहे. जागतिकिकरण आणि त्याचमागून अपरिहार्यपणे येणाऱ्या खाजगीकरणातुन शेतकऱ्याचा शेतमाल कवडी मोलाने विकत घेण्याची मुभा आणि त्याचबरोबर शेतक-र्यांच्या जमिनी गिळंकृत करण्याचा राजमार्ग या नवीन विधेयकात आहे.अशा या अन्याकारक विधेयकाचा निषेध नोंदवित व या विधेयकाला विरोध म्हणुन दिल्ली येथे गेले एक दिवस चालू असलेल्या कोणाला पाठिंबा म्हणून पुणे शहर वंचित बहुजन आघाडी तर्फे पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आले.

सदर आंदोलनात पुणे शहरातील जेष्टे नेते वसंतजी साळवे,वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते संतोष संखद,निर्मलाताई वनशीव, वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ऋषिकेश नांगरेपाटील, विशाल गवळी,
पुणे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव,
पुणे शहर कार्यकारी अध्यक्ष प्रफुल गुजर, प्रसिद्धी प्रमुख संजय गायकवाड, महासचिव जितेंद्र जाधव , महेश कांबळे, संघटक मनोज क्षिरसागर, सह संघटक सतिश रणावरे, प्रवक्ते गौरव जाधव, सदस्य मयुर शिंदे, दिपक ओव्हाळ, अॅड.अरविंद तायडे, विवेक लोंढे, पितांबर धिवार,फय्याज सय्यद,महेंद्र येरेल्लु,विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष शुभम चव्हाण, अक्षय बोटेगावकर, युवा आघाडीचे अतुल नाडे, ऒंकार कांबळे, महिला अध्यक्षा सिमा भालसेन, अनिता चव्हाण, रंजना कांबळे, प्रियंका लोंढे, प्रशांती साळवे, मालती बडेकर,संगिता कदम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading