हर्षवर्धन पाटील यांच्याकडून जनतेस भ्रमित करण्याचाच प्रयत्न – गोपाळदादा तिवारी
पुणे, दि. १७ – राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुण्यात ‘पत्रकार परीषदेत’ कृषी विधेयक व आंदोलन बाबत दिशाभूल करणारी वक्तव्ये केली. तसेच तत्कालीन कृषीमंत्री शरदर पवार साहेब व युपीए काळातील एपीएमसी सुधारणा (मॅाडेल ॲक्ट) महाराष्ट्राने स्वीकारल्याचे ‘अर्ध-सत्य’ही सांगितले..! त्या विषयी नेमलेल्या समितीचे ते स्वत:च अध्यक्ष असल्याचे ही सांगितले, हे देखील बरे झाले.. मग त्या मधील “कोणत्या अटी व दुरूस्ती स्वीकारल्या व कोणत्या नाही(?)” हे देखील सांगण्याची तसदी पाटील यांनी घेतली असती तर जनतेच्या ज्ञानात भर पडली असती.. ऐवजी त्यांनी “पवार साहेब कां विरोध करत आहेत” असा उलट प्रश्न विचारून, जनतेस भ्रमित करण्याचाच प्रयत्न केला आहे.. असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.
गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, हर्षवर्धन पाटील यांनी स्वत:च सांगितले की, त्यांच्या अध्यक्षते खालील समितीचा मसूदा त्यांनी तत्कालीन केंद्र सरकारला पाठवला, तर त्मग या ‘मसूद्याची प्रत’ देखील पत्रकारांना दिली असती तर अधिक बरे झाले असते..!
युपीए सरकार, पुर्वीचे वाजपेयी सरकार वा तत्कालीन कृषी मंत्री मा पवार साहेब या सर्वांचाच “APMC ॲक्ट सुधारणा व दुरूस्ती विषयी” आग्रह नक्कीच होता.. परंतू संपूर्ण APMC Act ला ‘स्क्रॅप’ करण्याचा मोडीत काढण्याचा) प्रयत्न नव्हता..! देशात ८४% शेतकरी अल्प भूधारक (३-५ एकरच्या आतील) असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन तत्कालीन एपीएमसी सुधारणा विधेयक नेमके कसे होते..? हे त्यांनीच सांगावे..! कारण त्या ‘मॅाडेल ॲक्ट’ मधील तरतूदी या
“कार्पोरेट कंपन्यांना” ‘किमान हमी भाव’ला तिलांजली देऊन शेतीमाल खरेदी करण्याचा अधिकार देण्याच्या नव्हत्या, कार्पोरेट्स ची ‘थकबाकी वा मालाचे देणे’ पैसे वाद ऊदभवल्यास, शेतकऱ्यांना कोर्टात जाण्या ऐवजी स्थानिक ‘प्रशासकीय लवादा’कडेच जाण्याची शेतकरी विरोधी तरतूद नव्हती, “जीवनावश्यक वस्तूंची यादी रद्द करण्याची” तरतूद नव्हती, तसेच कार्पोरेट्स वरील ‘साठवणूकी वरील निर्बंध’ ऊठवण्याची ही तरतूद नव्हती… त्यामूळे मा हर्षवर्धन पाटील यांनी समिती अध्यक्ष म्हणून काय प्रस्ताव दिला या बाबत ही माहीती द्यावी.. ते “शेतकरी विरोधी मुलभूत तरतूदींवर” वा त्यांचे हिताच्या नेमक्या बाबींवर बोलले असते तर ते अधिक ऊचीत ठरले असते, असे ही काँग्रेस चे ‘राज्य प्रवक्ते’ गोपाळ तिवारी यांनी दिलेल्या ‘प्रसिध्दी पत्रकात’ सांगून, मा हर्षवर्धन पाटलांनी निव्वळ ‘भाजपच्या दडपणा खालीच’ “वस्तुस्थिती विरोधी वक्तव्ये” करून जनतेस भ्रमित करू नये, ऐवजी “कार्पोरेट्सना मोकळे रान देऊन, शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल हे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पटवूव द्यावे असे आवाहन देखील गोपाळदादा तिवारी यांनी केले आहे.
