भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन
कोल्हापूर –भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन झाले. त्यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावली होती.
दिल्ली येथे १९५९ मध्ये झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत खंचनाळे यांनी किताब मिळवला होता.
त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
श्रीपती खंचनाळे हे मुळचे सीमाभागातील एकसंबा या गावचे आहेत. ते कित्येक वर्षांपासुन कोल्हापुरात वास्तव्यास होते.
यानंतर विविध कुस्ती स्पर्धेत त्यांनी कोल्हापूरचा डंका देशभर वाजवला. ते नवीन मल्लांना तालमीत धडे देण्याचे काम करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मल्लांनी विविध कुस्ती मैदाने गाजवली आहेत.
