Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENT

नचिकेत लेलेच्या विशेष बालगंधर्व अॅक्ट ने गाजवला मंच

प्रख्यात व महान नट बालगंधर्व यांच्या सोनेरी काळाला उजाळा देत आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेत स्पर्धक नचिकेत लेले याने इंडियन आयडॉल 2020 मध्ये स्त्रीची वेशभूषा करून अॅक्ट सादर करत सर्व परीक्षकांना थक्क करून सोडले.इंडियन आयडॉल 2020 च्या सेटवर त्याने अभिनय ही आपली असल्याचे आणि नटवर्य बालगंधर्व आपले प्रेरणास्थान असल्याचे बोलून दाखवले. त्यानंतर थोड्याच वेळात तो स्त्रीवेषात मंचावर दाखल झाला. त्याला न ओळखून परीक्षकांनी या बाई कोण आहेत, असे विचारले. तो नचिकेत आहे हे कळल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला!

त्याने “नाथ हा माझा मोही खला” हे लोकप्रिय नाट्यगीत उत्कृष्टरित्या सादर करून तर त्याने ती स्त्री भूमिका आणखीनच खुलवली. त्याच्या परफॉर्मन्सला परीक्षकांनी उभे राहून मानवंदना दिली! परीक्षक विशाल दादलानी म्हणाला, “इंडियन आयडॉलमध्ये यापूर्वी अशा प्रकारचा परफॉर्मन्स कधीच झाला नव्हता. तुझा हा परफॉर्मन्स अगदी अनोखा होता. दर वर्षी आम्हाला असा एखादा स्पर्धक सापडतो, जो इतर होतकरू गायकांसाठी किंवा स्पर्धकांसाठी एक मापदंड निर्माण करतो. यावर्षी तू त्या प्रकारचा स्पर्धक आहेस!” परीक्षक नेहा कक्कड आणि हिमेश रेशमिया एकदम म्हणाले की, “आमच्या या स्पर्धकांपैकी एकाने या दर्जाचा परफॉर्मन्स दिला, याचा आम्हाला अभिमान वाटतो. तुला बराच दूरचा पल्ला गाठायचा आहे. बाल गंधर्वांच्या आठवणी तू या मंचावरून जाग्या केल्यास, ही तुझ्यासाठीही अभिमानाची गोष्ट आहे.” हिमेश रेशमियाने तर मंचावर धावत जाऊन त्या वेषातील नचिकेतच्या सोबत योग्य सामाजिक अंतर राखून एक सेल्फी देखील घेतली.

नचिकेत आनंदून म्हणाला, “मंचावर परफॉर्म करण्याचा माझा हा एक उत्कृष्ट अनुभव होता. मला खूप आनंद झाला आहे आणि मी भारावून गेलो आहे. मला हे शक्य झाले आणि मी गुरुतुल्य आणि माझे प्रेरणास्थान बालगंधर्वांना आदरांजली अर्पण करू शकलो, याचा मला आनंद आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading