Thursday, September 3, 2026
PUNE

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुष्पा पुसाळकर स्मृती पुरस्कार कोल्हापूरच्या अक्षरदालन प्रकाशनाला

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वतीने, दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठी सुविचार प्रकाशन मंडळ  पुरस्कृत ‘कै. पुष्पा पुसाळकर स्मृती पुरस्कार’ दिला जातो. यावर्षीच्या सन २०२० च्या पुरस्कारासाठी, साहित्यिक आणि प्रकाशक प्रा. रुपाली अवचरे आणि चित्रकार जयदीप कडू यांच्या निवडसमितीने, अक्षरदालन प्रकाशन कोल्हापूरच्या ‘सह्याद्रीच्या गिरिशिखरावरून – भाग १ व २’ (लेखक डॉ. अमर अडके) या ग्रंथाची निवड केली आहे. रुपये ५०००/- स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी साहित्य संमेलनाध्यक्ष श्री. राजेंद्र बनहट्टी यांच्या हस्ते, आणि मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यांच्या उपस्थितीत १० डिसेम्बर २०२० रोजी एका अनौपचारिक समारंभात प्रदान केला जाणार आहे, असे कार्यवाह बंडा जोशी यांनी कळवले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading