fbpx
Friday, April 19, 2024
MAHARASHTRAPUNE

पुणे शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सर्जेराव जाधव यांचे पारडे जड

कोल्हापूर, दि. 30 – पुणे शिक्षक मतदार संघाची निवडणूक उद्या 1 डिसेंबर रोजी होत आहे. महा ठोका संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव रामचंद्र जाधव स्वतः निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जात आहेत. शिक्षकांच्या समस्या सोडवताना आलेले अनुभव, त्या माध्यमातून संपूर्ण मतदार संघाशी साधलेला संपर्क व त्यांनी केलेले भरीव कार्य या सर्जेराव जाधव यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे जाधव यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.


सर्जेराव जाधव यांचा पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश शिक्षकांशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध व ऋणानुबंध, त्यांची पुण्याई ही कामी येणार आहे. शिक्षकांच्या समस्या, अडचणी सोडविल्याने जाधव यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्याचीही भावना मतदारांत आहे. बहुतांश शिक्षकांनी एकमुखाने सर्जेराव जाधव यांना सक्रिय पाठिंबा दिला आहे. निवडणुकीत प्रथम क्रमांकाची सर्वाधिक मते मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


महा ठोका ही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढणारी शिक्षक संघटना आहे. सर्जेराव जाधव हे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. संघटनेच्या माध्यमातून
त्यांनी सोलापूर, पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांचे मार्गे लावले आहेत. पुणे, सोलापूर येथे अनेकदा आंदोलने, उपोषणे करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. सन 2009 पासून सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या मान्यता मिळत नव्हत्या. तसेच त्यांना पगारही मिळत नव्हता. त्यांना मान्यता मिळवून देण्यासाठी उपोषणाचे हत्यार उपसले. सोलापूर जिल्ह्यात मान्यता शिबिर लावून जिल्ह्यातील 367 शिक्षकांना व रयत शिक्षण संस्थेच्या 56 शिक्षकांना मान्यता देण्यास भाग पाडले. अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ करण्यासाठी शासन आदेश काढण्यात प्रयत्न करून अनेक शिक्षकांना पूर्णवेळ मान्यता मिळवून दिल्या. रयत शिक्षण संस्थेच्या अनुकंपा तत्वावरील शिक्षक आणि लिपिक यांना मान्यता मिळवून दिल्या. तसेच बऱ्याच संस्थांमध्ये वाद असल्याने शाळा चालवण्यासाठी समन्वय साधून प्रशासकीय काम करण्यास मदत केली.

विनाअनुदान तत्त्वावर बदली केलेल्या कर्मचाऱ्यांना मान्यता मिळावी, यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे येथे ठिय्या आंदोलन व उपोषण करून मान्यता देण्यासाठी भाग पाडले. अनेक शिक्षकांची उच्च न्यायालयात प्रकरणे असल्याने शिक्षण विभागाला शासन परिपत्रकानुसार सुनावणी घेऊन मान्यता देण्यास भाग पाडले.
सर्जेराव जाधव यांनी पुणे शिक्षक मतदारसंघातील अनेक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. कुणाच्या दबावाला बळी न पडता, कुठल्याही राजकीय पक्षाचे लेबल न लावता केलेल्या कामावर भर देत आपण निवडणुकीला सामोरे जात असल्याचे जाधव यांनी सांगितले. शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यात आपण वीस वर्षे खर्च केले आहेत, त्यामुळे सामान्य शिक्षक आपल्यालाच मतदान करतील, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading