वंचित च्या आजी – माजी पदाधिकारी आणि संलग्न संघटनांची बैठक संपन्न

पुणे, दि. 22 – वंचित बहुजन आघाडी,पुणे शहरच्यावतीने पुणे शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी, युवक आघाडी, महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांची संयुक्त बैठक बोलविण्यात आली होती.
या बैठकीत पुणे पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघ, युवा आघाडी पुणे शहर कार्यकारीणीच्या बांधणी संदर्भात *व दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजी संविधान दिनी संविधान सन्मान रॅली संदर्भात चर्चा करण्यात आली. पदवीधर मतदार संघातील मतदानाच्या अनुषंगाने किशोर लष्करे यांनी माहिती दिली. तर संविधान रॅलीच्या व युवक आघाडी बांधणीच्या बाबत प्रदेश प्रवक्ता संतोष संकद तसेच युवक आघाडी प्रदेश कार्यकारणी सदस्य ऋषिकेश नांगरे पाटील, शहर अध्यक्ष मुनवर कुरेशी यांनी अनुक्रमे मार्गदर्शन केले. यावेळी पुणे शहर वंचित बहुजन कार्यकारीणीतील उपाध्यक्ष प्रविण गायकवाड, महासचिव महेश कांबळे, प्रसिद्धी प्रमुख संजय गायकवाड,सदस्य सोमनाथ पानगवे, आप्पा क्षिरसागर, सह संघटक सतीश रणवरे,सहसचिव मनोज सिरसागर, व पुणे शहर कार्यकारणी,महिला आघाडी प्रदेश सदस्या श्रीमती वनशिव,जिल्हा अध्यक्ष सिमा भालेसिंग, महासचिव वैशाली गायकवाड, तसेच महिला आघाडीतील अनेक पदाधिकारी उपस्थित होत्या.

वडगांव शेरी विधानसभा अध्यक्ष विवेक लोंढे व कार्यकर्ते, हडपसर विधानसभा अध्यक्ष पितांबर धिवार व कार्यकर्ते, कॅन्टोन्मेंट अध्यक्ष फय्याज शेख व कार्यकर्ते, त्याचप्रमाणे शिवाजीनगर मतदार संघातील, पर्वती मतदार संघातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.वंचित बहुजन युवक आघाडीतील अतुल नाडे तसेच पुणे शहरातील अनेक युवक उपस्थित होते. प्रदेश कार्यकारीणीचे प्रदेश सदस्य ऋषिकेश नांगरे पाटील यांच्या आवाहनाला प्रतीसाद देत अनेक तरुणांनी आघाडीत काम करण्यास इच्छुक असणाऱ्यनी आपली नावे नोंदवली. सम्यक विद्यार्थी आंदोलन चे शुभम चव्हाण व विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: