स्थानिक पातळीवरील निवडणुका लढण्याच्या तयारीला लागा – किरण घोंगडे

ग्रामशाखेच्या अध्यक्षाचा सत्कार करुन रिपब्लिकन सेनेच्या वर्धापनदिन सोहळ्याला प्रारंभ

औंढा ना.( जि. हिंगोली) – स्थानिक पातळीवरील निवडणुका लढण्याच्या तयारीला लागा, रिपब्लिकन सेनेचा 22 वर्धापनदिन सोहळा यजमान निवास औंढा ना.येथे आयोजित करण्यात आला होता बैठकीचे मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हाप्रमुख किरणभाऊ घोंगडे बोलत होते,

या वेळी शाहीर आंनद किर्तने,जिल्हा नेते राहुल पुंडगे, युवा जिल्हाध्यक्ष विक्की काशिदे, जिल्हा महासचिव गोरख खिल्लारे, हिंगोली तालुका अध्यक्ष भारत गडधने,युवा जिल्हा नेते नितीन खिल्लारे,ज्ञानेश्वर ठोके,यांनी उपस्थित पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले.
पुढे बोलतांना घोंगडे म्हनाले कि रिपब्लिकन सेना हि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु श्रद्धेय आंनदराज आंबेडकर यांची आहे.आक्रमक आंबेडकरी नेता म्हणून मा. आंनदराज आंबेडकराचीं ओळख झाली आहे.
महाराष्ट्र राज्यात बहुजन समाजाला विशेषकरून बौद्ध समाजाच्या उन्नतीसाठी,न्यायासाठी झगडणारा पक्ष म्हणून रिपब्लिकन सेना ओळख निर्माण केली आहे,
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे जाळे आसुन त्याचा फायदा पक्षाला होने अपेक्षित आहे. तसेच होऊ घातलेल्या स्थानिक पातळीवरील निवडनुका रिपब्लिकन सेना ताकदीने लढणार आसुन तेंव्हा आपण आपली ताकद दाखवण्यासाठी अहोरात्र परीश्रम घेतले पाहिजे, त्याच तयारीने कामाला लागुन गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यक्रता मोहिम राबवावी असे आवाहन जिल्हाप्रमुख किरणभाऊ घोंगडे यांनी केले, या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंडित सुर्यतळ यांनी केले तर आभार युवा शहराध्यक्ष नितीन गव्हाणे यांनी मानले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक, कवी आनंद किर्तने उपस्थित होते
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाळासाहेब घनसावंत, पंडित खिल्लारे, विनोद जोगदंड, यशवंत साळवे,अशिष मुळे,नागेश घोंगडे, अनिल ठोके,लखन सरतापे, सुनील ठोके,संजय खंदारे,गौतम सरतापे, करण साळवे,करण वाघमारे, दिलिप लोणकर, पप्पु गायकवाड, राजेश झोडगे,नागनाथ घोंगडे, असंघ घोंगडे, आंनद घोंगडे, पंडित राठोड, बालाजी खंदारे जमुनाबाई पांडवविर ,खंडेराव आव्हाड, पप्पु गायकवाड आदिसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: