कोरोना – मुंबई-दिल्ली विमान, रेल्वे सेवा बंद होण्याची शक्यता


मुंबई, दि. 20 – कोरोना व्संसर्ग थोपविण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यातून निर्माण झालेली स्थिती सुधरवण्यासाठी अनलॉक करण्यात आला. आता कुठे परिस्थीती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तोपर्यंतच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई-दिल्ली विमान आणि रेल्वे सेवा बंद पुन्हा एकदा बंद करण्याबाबत प्रस्ताव विचाराधीन आहे.

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असे तज्ज्ञच म्हणत होते. त्यात आता दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे दिल्ली येथे काही प्रमाणावर पुन्हा एकदा निर्बंध लावले जात आहेत. त्यातच आता मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र सरकारही सावध पावले टाकताना दिसत आहे. त्यामुळे दिल्ली-मुंबई विमान, रेल्वे सेवा यांच्यावर निर्बंध येऊ शकतात, असे वृत्त इंडिया टुडेनं सूत्रांच्या हाव्याने याबाबत वृत्त दिले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: