कोरोना – पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या वाढली

पुणे – शहरात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधितांची संख्या वाढलेली आहे. शुक्रवारी दिवसभरात नव्याने 372 बाधित सापडले असून, एक महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोनामुक्त व्यक्तींपेक्षा नवीन बाधितांची संख्या अधिक असल्याची नोंद झाली आहे.

बाधितांच्या वाढत्या संख्येबरोबर मृत्युच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात शहरात 10 जणांचा करोनामुळे मृत्यु झाला आहे. सक्रीय बाधितांची संख्या 4 हजार 628 झाली असून, गेल्या 24 तासात जवळपास तीनशेने वाढ झाली आहे. मागील आठवड्यात दीड ते दोन हजारापर्यंत होणारी दररोजची नमुने तपासणी संख्या आता तब्बल चार हजारांवर पोहचली आहे. दिवसभरात 209 बाधित करोनामुक्‍त झाले आहेत.

ऑक्‍सीजनवरील बाधितांच्या संख्येने पुन्हा एक हजाराचा टप्पा ओलांडला असून, व्हेंटीलेटरवरील बाधितांची संख्याही वाढली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: