विधानपरिषद – वंचितच्या उमेदवारांची विविध संस्थाना भेट

पुणे, दि. 13 – पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघ या दोन्ही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माबाळासाहेब आंबेडकर यांनी प्रा सोमनाथ साळुंखे आणि श्री सम्राट शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. आज अर्ज छाननी मध्ये दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.
त्या नंतर दोन्ही उमेदवार पुण्यातील काही प्रमुख संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या त्यामध्ये मा पी ए इनामदार, कॉस्मोपॉलिटन शिक्षण संस्था यांची भेट घेतली. त्याचप्रमाणें मा उस्मान हिरोली, मा नगरसेवक यांची भेट घेऊन त्यांच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मदत करण्याची विनंती केली. यावेळी पुणे शहर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा मुनवर कुरेशी, उपाध्यक्ष प्रविण गायकवाड, महासचिव महेश कांबळे, विधी सल्लागार श्री मनोज माने, प्रसिद्धी प्रमुख संजय गायकवाड,मनोज क्षिरसागर, वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष विवेक लोंढे, युवक आघाडीचे अतुल नाडे, धम्मानंद चंदनशिवे इ. त्याचप्रमाणे सातारा, सांगली जिल्ह्यातील अनेक शिक्षक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: