‘फार्मा क्षेत्रातील महिला उद्योजकांपुढील आव्हाने’  विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रास प्रतिसाद

पुणे, दि. 8 – महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने ‘फार्मा क्षेत्रातील महिला उद्योजकांपुढील आव्हाने’ विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. प्रीती मोहिले (मीडिया मेडिक कम्युनिकेशन,मुंबई ), डॉ स्वाती पुंड (बायोबे सोल्युशन्स,पुणे ) डॉ.अमिता कर्णिक (ऍमिकोन आर एक्स कन्सल्टन्सीज,मुंबई ), डॉ मीनाक्षी देवधर (कोकण संपन्न प्रा ली ,दापोली ) यांनी फार्मसी क्षेत्रातील महिला उद्योजकतेविषयी मार्गदर्शन केले. 

 संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार,उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. डॉ किरण भिसे यांनी स्वागत केले. अरीझ सिद्दीकी,डॉ एस आर हर्डीकर,डॉ कांचन चव्हाण,अस्मा पठाण ,रजत सय्यद यांनी संयोजन केले. आझम कॅम्पस येथे झालेल्या या चर्चासत्राला देशभरातुन ११० विद्यार्थी ,प्राध्यापक ,संशोधक उपस्थित होते.  

Leave a Reply

%d bloggers like this: