रोटरी क्लब सहवास व बिबवेवाडी कडून ३०० स्कूल व्हॅन चालकांना किराणा वाटप

पुणे, दि. ८ – रोटरी क्लब सहवास व रोटरी क्लब बिबवेवाडी आणि एस जी अॅनालॅटिक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ३०० स्कूल व्हॅन चालकांना किराणा वाटप करण्यात आले. “एक निश्चय”या योजने अंतर्गत कंपनीचा हा सीएसआर प्रकल्प आहे.ज्यामध्ये आतापर्यंत ८००० किटसचे वाटप करण्यात आले आहे.

या प्रकल्पा अंतर्गत आतापर्यन्त लाभार्थ्यांना एक लाख किलो पेक्षा जास्त मदत वाटप करण्यात आली आहे. कंपनीचे संचालक सुशांत गुप्ता यांची भूमिका अशी आहे की लॉकडाउन मुळे अनेक लोकांना कठीण परिस्थितिला सामोरे जावे लागत आहे.आणि या वाटपाकडे मदत म्हणून न बघता आमच्या मित्रांना या महामारीच्या काळात व्यवसायामध्ये झालेल्या नुकसान भरपाई मध्ये दिलेली सेवा आहे.मानधन आहे असे समजून बघितले जावे.या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल रो. रश्मी कुलकर्णी,डिस्ट्रिक्ट डायरेक्टर प्रोजेक्ट शीतल शहा,रोटरी क्लब सहवासचे अध्यक्ष किरण इंगळे,सचिव रो.प्रकाश अवचट,बिबवेवाडी क्लबचे अध्यक्ष रो.अंकुश पारख,सचिव रो.वर्धमान गांधी,पुणे परिवहन अधिकारी रघुनाथ कान्हेरकर,सहवास व बिबवेवाडी क्लबचे सदस्य,आदि मान्यवर उपस्थित होते.रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल क्लबने सर्व कायदेशीर बाबी सांभाळल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: