श्रवणातून अभ्यास करण्याचा अनोखा पर्याय

मित्रांनो, अभ्यास करायचाय? मग ‘ऐकाकी’!

पुणे : विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करायचाय? तोही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने. तर मग ‘ऐकाकी’ हा मंत्र लक्षात ठेवा. कारण आठवी ते दहावीच्या एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व पुस्तके विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकरिता एका विशेष ऑडिओ लर्निंग ॲपमध्ये आली आहेत. त्यामुळे ‘हल्लीची मुले ऐकतात’ हे विधान धाडसाने करता येत आहे, अशी माहिती इन्स्पायरच्या मंजुषा वैद्य व सचिन पंडित यांनी दिली.

पुण्यातील इन्स्पायर संस्थेने स्टार्टअपच्या माध्यमातून हे ‘ऐकाकी’ ॲप विकसित केले आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे संपूर्ण शिक्षण ऑनलाईन झाले आहे. परंतु, या पद्धतीत अनेक समस्यांचा सामना विद्यार्थी पालक व शिक्षकांना करावा लागत आहे. ऑनलाईन शिक्षणपद्धती अधिकाधिक सोपी करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. यातूनच या ‘ऐकाकी’ विशेष ऑडिओ लर्निंग ॲपची निर्मिती झाली आहे.

मंजुषा वैद्य म्हणाल्या,”लॉकडाऊनमुळे विद्यार्थी शाळांमध्ये जाऊन मिळणाऱ्या प्रत्यक्ष शिक्षणाला मुकत आहेत. शाळा ऑनलाईन सुरू असल्या, तरी शिक्षणातून मिळणार्या कल्पनाशक्तीला वाव मिळणे कमी झाला आहे. विद्यार्थ्यांना सतत मोबाईल, लॅपटॉप, संगणकाच्या माध्यमातून शिक्षण घ्यावे लागत आहे. अभ्यासही त्यावरच करावा लागतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचा वाढता त्रास पाहून पालकही चिंतेत आहेत. त्यामुळे ऐकूनही उत्तम अभ्यास होऊ शकते, ही गरज ओळखून ‘ऐकाकी’ या ॲपची निर्मिती झाली आहे.”

‘ऐकाकी’ ॲपची वैशिष्ट्ये…

  • आठवी ते दहावी महाराष्ट्र बोर्डाची संपूर्ण पाठ्यपुस्तके रेकॉर्डे स्वरूपात.
  • विविध कलाकारांच्या आवाजात सर्व धडे ध्वनिमुद्रित
  • विद्यार्थ्यांच्या भाषा विकसनास मदत.
  • शब्दसंग्रह वाढण्यासह शब्दोच्चार सुधारतील.
  • विद्यार्थ्यांची ऐकून ग्रहण करण्याची क्षमता वाढेल
  • कल्पनाशक्तीचा (इमॅजिनेशन पॉवर) विकास होण्यास मदत.
  • अंध विद्यार्थ्यांना या ॲपचा अधिक चांगला फायदा
  • गुगल प्लेस्टोअरवर विनामूल्य डाउनलोड उपलब्ध


‘ऐकाकी’मुळे विद्यार्थी गुंतून राहतील
तंत्रज्ञानाच्या या युगात मुलांच्या कानी हेडफोन दिसले नाहीत, तर नवलच! या हेडफोनद्वारे त्यांच्या डोक्यात अभ्यास मनोरंजनात्मक पद्धतीने जावा, यासाठी ‘ऐकाकी’ ऑडिओ ॲप उपयुक्त ठरेल. हलक्या स्वरूपातील पार्श्वसंगीत विद्यार्थ्यांना धडे ऐकताना गुंतवून ठेवण्यास मदत करेल. ‘प्लेस्टोवर’वर हे ऍप उपलब्ध असून, त्याचा वापर करण्यासंदर्भातील माहिती व्हिडीओद्वारे देण्यात आली आहे. इंग्रजी तसेच मराठी माध्यमातील विद्यार्थी याचा उपयोग करू शकतात.

  • सचिन पंडित- इन्स्पायर, पुणे

Leave a Reply

%d bloggers like this: