सोनालिका ट्रॅक्टर्स ने  ऑक्टोबर मध्ये १९००० ट्रॅक्टर ची डिलिव्हरी करून उच्चांक गाठला

पुणे – चालू वर्षीच्या पहिल्या सहामाहीत नोंदलेल्या अभूतपूर्व व्यवसायवृद्धीच्या पार्श्वभूमीवर, भारतातील आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॅक्टर निर्यातदार सोनालिका ट्रॅक्टर्स ने  ऑक्टोबर २०२० मध्ये १९००० ट्रॅक्टर ची डिलिव्हरी आणि  15,218 ट्रॅक्टर चे उत्पादन करून एका महिन्यात झालेल्या कामगिरीचा उच्चांक नोंदला आहे.  आमच्या देशांतर्गत व्यवसाय वृद्धीचे प्रमाण १३.३ टक्के आहे तर तुलनेने ट्रॅक्टर उद्योगाची वाढ अंदाजे ७.५ टक्के आहे. आमची एप्रिल – ऑक्टोबर २०२० या काळातील  ट्रॅक्टर बिलिंग मधील एकत्रित वाढ   २८.७% , म्हणजे  ट्रॅक्टर उद्योगात सर्वाधिक मोठी  आहे.

सोनालिका समूहाचे कार्यकारी  संचालक श्री रमण मित्तल यासंदर्भात म्हणाले, आमची २०-१२० हॉर्स पॉवर ट्रॅक्टर ची विस्तृत उत्पादन श्रेणी आणि ७० हून जास्त अवजारे लोकप्रिय असून शेतक-यांची उत्पादकता वाढवण्यात मोठी मदत करतात. अलीकडेच आम्ही बाजारात आणलेली टायगर ही प्रीमिअम उत्पादने  त्यांचे युरोपिअन डिझाइन आणि उत्तम कामगिरी यामुळे  शेतक-यांच्या पसंतीस उतरली आहेत.  सिकंदर DLX हे आमच्या सिकंदर या प्रमुख ब्रँड चे सुधारित स्वरूप ,लोकप्रिय ठरत आहे आणि दस डी लक्स खुबियां- दहा उत्तम वैशिष्ट्ये ही आपली ग्वाही सार्थ करत आहे.  स्टाइल , आराम आणि कार्यक्षमता यांचे अजब रसायन या ट्रॅक्टर मध्ये आहे. कस्टमाइज्ड  ट्रॅक्टर मधील महाबली आणि छत्रपती हे ट्रॅक्टर विविध प्रदेशातील शेतीच्या गरजेनुसार बनवले जातात.  हे चार ट्रॅक्टर  कंपनीच्या एकूण विक्रीत २०-२५ टक्के हिस्सा व्यापतील आणि कृषि – यांत्रिकीकरणाच्या प्रक्रियेला पाठबळ देतील.”

ते पुढे म्हणाले आमच्या उत्पादनाने सर्वोच्च पातळी गाठली असूनही आज आमच्या डेपो आणि डीलरशिप मध्ये ‘स्टॉक संपला’ अशी स्थिती आहे.  मात्र आम्ही ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सज्ज होत असून धनत्रयोदशी आणि दिवाळी च्या दिवशी डिलिव्हरी देण्यासाठी पुरेसे उत्पादन करून आणखी एक “सर्वोच्च कामगिरीचा महिना” साजरा करू. आमची निष्ठा आणि उमेद यांच्या आधारावर दर महिन्यात प्रगतीचे नवे टप्पे गाठून आमच्या उत्कृष्ट उत्पादनांच्या बळावर जगभरातील शेतक-यांची भरभराट घडवून आणण्यासाठी आम्ही तयार आहोत.

Leave a Reply

%d bloggers like this: