Tuesday, June 16, 2026
PUNE

नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या ‘कृतज्ञ दिवाळी ‘सरंजाम वाटप उपक्रमास प्रारंभ  


पुणे : शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष  आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने  आयोजित  ‘कृतज्ञ दिवाळी ‘सरंजाम वाटप कार्यक्रमास भारतीय जनता पक्ष पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. बालेवाडी तील भारती विद्यापीठ शाळेच्या मैदानात गुरुवारी सायंकाळी या उपक्रमाचे उदघाटन झाले. 


या सरंजाम मध्ये दिवाळीसाठी जीवनोपयोगी साहित्य आहे. रवा,मैदा ,पिठीसाखर, तेल,बेसनपीठ,डालडा, भाजके पोहे,मिठपुडा, फुटाणा डाळ, मोती साबण, खोबरे, उटणे,पणती,अगरबत्ती,सुगंधी तेल,रांगोळी चा या दिवाळी सरंजाम मध्ये समावेश आहे. ५ हजार कुटुंबामध्ये दिवाळीचा आनंद पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवून ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान बालेवाडी मध्ये आयोजन  या कृतज्ञता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 
‘कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व क्षेत्रात असलेली मंदी पाहता सर्व कुटुंबियांना दिवाळी चे नियोजन करताना अडचणी येत आहेत. दिवाळी सणाच्या दिवसात हे अडचण ,नैराश्याचे मळभ दूर करण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत’,असे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले. 
५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता या उपक्रमाचे उदघाटन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते झाले.बालेवाडी येथील भारती विद्यापीठ शाळेच्या मैदानात हा उदघाटन कार्यक्रम झाला.नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उपक्रमाची माहिती  दिली. या उपक्रमात सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळण्यात आले. 
सर्वांची दिवाळी निरामय आरोग्याची जावी,याची काळजी घेतली जाणार आहे,असेही बालवडकर यांनी सांगितले.’कृतज्ञ दिवाळी हा उपक्रम स्तुत्य असून सर्वांपर्यंत आनंद पोहोचविणारा आहे. नगरसेवक अमोल बालवडकर हे सर्वांच्या भावना जाणून त्याप्रमाणे अभिनव उपक्रम आयोजित करतात. त्यांच्या कार्याचे अनुकरण केले पाहिजे’,असे प्रतिपादन जगदीश मुळीक यांनी केले. 
या प्रसंगी  अनिल बालवडकर, दत्ता बालवडकर, आत्माराम बालवडकर, हनुमंत बालवडकर, भाजपा युवा मोर्चा कोथरुड विभाग  उपाध्यक्ष कृष्णा बालवडकर, शशिकांत बालवडकर, राजेश बालवडकर, सागर बालवडकर, प्रविण बालवडकर, अनिल ससार व अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सर्व सभासद व नागरीक उपस्थित होते.ना नफा ना तोटा या तत्वावर हा उपक्रम करण्यात आला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading