fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENT

स्टोरी 9 मंथ्स की मालिकेत आलिया श्रॉफची भूमिका साकारणार सुकीर्ती कांडपाल

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच सुरू होत आहे, एक नवीन आणि आगळीवेगळी मालिका – स्टोरी 9 मंथ्स की. ही एक रोमॅंटिक कॉमेडी- रॉम-कॉम असून त्यात सभ्य आलिया आणि रांगड्या सारंगची योगायोगाने जुळून आलेली प्रेम कहाणी आहे. हे दोघे IVF च्या एका अनपेक्षित चमत्कारामुळे एकत्र येतात. टेलिव्हिजन उद्योगातील एक सुपरिचित अभिनेत्री सुकीर्ती कांडपाल या मालिकेत आलिया श्रॉफची मुख्य भूमिका साकारणार आहे. आलिया श्रॉफ एक यशस्वी आणि महत्त्वाकांक्षी व्यावसायिक आहे. ती एक धडाडीची स्त्री आहे आणि आयुष्यात तिने सर्व गोष्टी व्यवस्थित आखणी करून केलेल्या आहेत. लग्नात अपयशी ठरल्यानंतर ती IVF द्वारे एका मुलाची आई होण्याचे ठरवते.

आलियाची भूमिका साकारण्याबद्दल सुकीर्ती उत्साहाने सांगते, “स्टोरी 9 मंथ्स की एक पुरोगामी कथा आहे आणि ही भूमिका करण्यासाठी मी आतुर आहे. आलियासारखी सशक्त भूमिका साकारताना मला आनंद होत आहे. ही आलिया आई होण्यासाठी IVF चा मार्ग अवलंबणार आहे. आलियासारखी व्यक्तिरेखा मी पहिल्यांदाच साकारणार आहे.”

पुस्ती जोडत ती म्हणते, “बर्‍याच काळापासून मी अशा एखाद्या भूमिकेच्या शोधात होते, जी मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळी असेल. व्यक्तिशः मला आलिया हे पात्र खूप जवळचे वाटते. ती आजच्या काळाची स्त्री आहे. जीवनाविषयीचा तिचा दृष्टिकोन व्यापक आहे आणि विचार पुढारलेले आहेत. आलिया सारखी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळणे ही खूप आनंददायक बाब आहे.”

बघा, स्टोरी 9 मंथ्स की, 23 नोव्हेंबरपासून दर सोमवार ते गुरुवार रात्री 10:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading