युवरहायनेस भारतीय रस्त्यांवर दाखल; होंडातर्फे H’ness-CB350 चे ग्राहकांना वितरण सुरू

बहुप्रतीक्षित रोअर ऑफ हायनेस भारतीय रस्त्यांवर पोहोचली असून होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने H’ness-CB350 चे ग्राहकांना वितरण सुरू केले आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आलेली H’ness-CB350 ही होंडाची मध्यम आकाराच्या 350- 500 सीसी मोटरसायकल क्षेत्रातील पहिली गाडी आहे.

होंडाच्या सीबी ब्रँडचा समृद्ध वारसा पुढे नेणारी H’ness-CB350 अत्याधुनिकनव्या वैशिष्ट्यांसह आणि जुन्या दुनियेच्या आठवणींसह तयार करण्यात आली आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, H’ness-CB350 हे होंडाच्या बिगविंग पोर्टफोलिओ म्हणजेच एक्सक्लुसिव्ह प्रीमियम बाइक विभागातील तिसरे बीएसव्हीआय मॉडेल आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि या विभागातील सर्वोत्तम वैशिष्ट्यांमुळे H’ness-CB350 राजेशाही अनुभूती देणारी खरी साथीदार आहे.

H’ness-CB350 च्या वितरणास प्रारंभ केल्याविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. यदविंदरसिंग गुलेरिया म्हणाले, H’ness-CB350 चे लाँच हे मजेदार रायडिंगचा अनुभव भारतीयांना देण्याप्रती आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. सीबी डीएनएसह तयार करण्यात आलेली H’ness-CB350 मालकीचा अनोखा अनुभव देण्यासाठी तसेच मध्यम आकाराच्या मोटरसायकलप्रेमींच्या इच्छा- आकांक्षांना पंख देण्याच्या हेतूने तयार करण्यात आली आहे. आजपासून ग्राहकांना या गाडीचे वितरण केले जाणआर असून रायडिंगचा हा अनोखा आनंद भारतीय रस्त्यांवर आणल्याबद्दल आम्ही खूष आहोत.

महत्त्वाची विश्वासार्हता

ग्राहकांच्या आनंदात भर घालण्यासाठी होंडाने या क्षेत्रात पहिल्यांदाच 6 वर्षांचे वॉरंटी पॅकेज देणार आहे.

 (*3 वर्ष नेहमीची + 3 वर्ष पर्यायी विस्तारित वॉरंटी) दिली जाणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: