Thursday, September 3, 2026
MAHARASHTRA

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले मंदिराच्या बाहेरूनच श्री तुळजाभवानीचे दर्शन

तुळजापूर, दि.२१ :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पीक नुकसानीच्या पाहणीसाठी व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी श्री तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरुनच श्री तुळजाभवानी मातेचे त्यांनी दर्शन घेतले व श्री तुळजाभवानी मातेला शेतकरी बांधवावर आलेले संकट दूर करण्याचे साकडे त्यांनी घातले.

यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मिलिंद नार्वेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंदिर संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading