राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी ओयो प्रयत्नशील

मुंबई, दि. 21 –  महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विकासाची वाट सोपी करण्याच्या (इज ऑफ डुइंग बिजनेस) आणि परवान्यांची संख्या कमी करण्याच्या  धोरणाला प्रतिसाद देत  ओयो  हॉटेल्स अँड होम्स  ने राज्यातील पर्यटन व्य्ववसायाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार पुन्हा स्पष्ट केला आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सहकार्याने होत असलेल्या  “ओयो संवाद” या चर्चासत्र मालिकेत अलीकडेच आयोजित केलेल्या चर्चेत कंपनीने राज्यात विस्तार करण्याची योजना जाहीर केली.  पर्यटन आणि पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव  वलसा नायर – सिंग  यांचा या वेबिनार मध्ये सहभाग होता.  

हॉटेल आणि पर्यटन व्यवसायाची भविष्यातील वाटचाल आणि कोविड १९ च्या वातावरणात महाराष्र सरकारने या व्यवसायाला नव्याने उभारी यावी यासाठी केलेल्या उपायांवर चर्चेत भर होता.  ओयो  हॉटेल्स अँड होम्स चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रितेश अगरवाल आणि ओयो भारत आणि दक्षिण आशिया विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहित कपूर यांचे यजमानपद लाभलेल्या या चर्चासत्रात कंपनीने या  व्यवसायाच्या प्रगतीसाठी आणि सदस्य हॉटेलांमधील खोल्याना पुन्हा मागणी यावी यासाठी केलेले उपाय तसेच महाराष्ट्र सरकारने राज्यांतर्गत प्रवासाला चालना देण्यासाठी जाहीर केलेल्या धोरणाला पूरक योजनांची माहिती दिली. हॉटेल चेन व्यवस्थापन करणा-या ओयो ने नव्याने वेग घेतलेली पर्यटन क्षेत्राची वाढ, प्रवासाचे वाढते प्रमाण तसेच सणासुदीच्या काळात प्रवास करण्याचा आनंद मिळवण्याची ग्राहकांची आकांक्षा याचा लाभ मिळविण्यासाठी आरोग्यदृष्ट्या सुरक्षित वास्तव्य (सॅनिटाइज्ड स्टे) देऊ करण्याची सज्जता केली आहे. ओयो हॉटेल्स च्या राज्यभरातील १७० सदस्य हॉटेल सदस्यांनी वेबिनार मध्ये उपस्थिती लावली.  

वेबिनार मध्ये विचार मांडताना महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात पर्यटनाच्या आणि हॉटेल व्य्ववसायाच्या अमर्याद संधी आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतात तसेच राज्याला चांगला महसूलही मिळतो. महाराष्ट्राचे निसर्गसौंदर्य अभिमानास्पद आहे आणि किनारी पर्यटन, तीर्थयात्रा, वारसा स्थळांना भेटी, पर्यावरण परिचय देणारे पर्यटन आणि कृषि पर्यटन यामध्ये असलेल्या संधींना प्रोत्साहन देत आहोत. राज्यात येणा-या पर्यटकांना जागतिक दर्जाचा अनुभव मिळावा यासाठी आम्ही विविधांगी धोरणांचा अवलंब करत राहू.  लॉक डाउन च्या काळात आमचा सारा रोख हॉटेल व्यवसायातील उद्योजकांना उत्तेजन देणे, या व्यवसायाला पूरक धोरणे अवलंबून पर्यटनाला गती देणे आणि आपल्या राज्यातील पर्यटन संधींची जगाला जाणीव करून देणे यावर राहिला आहे.  ओयो सारख्या एका भारतीय कंपनीने केलेल्या प्रयत्नांबद्दल आम्हाला आनंद आहे आणि या हॉटेल चेन च्या राज्यात येणा-या पर्यटकांना स्वस्त, सुरक्षित आणि आरोग्यकारी आतिथ्य उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना आमचा पाठिंबा राहील.

 महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव  वलसा नायर – सिंग म्हणाल्या, ” राज्यात पर्यटनाला जोर मिळावा म्हणून आम्ही काही मोठे निर्णय घेतले आहेत आणि लवकरच काही नव्या योजना जाहीर करणार आहोत. आरोग्य, सुरक्षितता आणि स्वच्छता यासाठीचे नियम तयार करताना ओयो हॉटेल अँड होम्स च्या काही सूचना आम्ही विचारात घेतल्या आहेत. राज्यात नवी हॉटेल सुरु करण्यासाठी उद्योजकांना प्रवृत्त करून राज्यात येणारा पर्यटकांचा ओघ वाढवण्यासाठी आम्ही ओयो चे सहकार्य घेऊ.”

ओयो  हॉटेल्स अँड होम्स चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रितेश अगरवाल  यांनी कंपनीच्या महाराष्ट्रासाठीच्या योजनांची माहिती देताना सांगितले, ” पर्यटन आणि पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव  वलसा नायर – सिंग  यांनी या चर्चेसाठी मूल्यवान वेळ दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. राज्यातील हॉटेल व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी राज्याने स्वीकारलेला दृष्टिकोन आणि धोरणात्मक उपाय याबद्दल आमच्या १७० हून सदस्य हॉटेल चालकांना या चर्चेदरम्यान महत्वाची माहिती मिळाली. महाराष्ट्र ही पर्यटन व्यवसायाची मोठी बाजारपेठ आहे. आम्ही राज्यात ५००० पेक्षा जास्त रोजगार निर्माण केले आहेत आणि येथील व्यापक पर्यटन संधींचा लाभ घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पर्यटकांना सुरक्षित आणि आरामदायी वातावरणात राहता यावे यासाठी आमचे आणि आमच्या शेकडो सदस्य हॉटेलांचे सतत प्रयत्न असतील.” 

ओयो भारत आणि दक्षिण आशिया विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहित कपूर यांनी  पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव  वलसा नायर – सिंग  यांच्याशी संवाद साधला. या वेळी राज्यातील वेबिनार मध्ये सहभागी हॉटेल सदस्यांनी विविध प्रश्न विचारून पर्यटनाला उत्तेजन देण्यासाठी आणि येत्या सणांच्या काळात असलेली संधी मिळवण्यासाठी सरकारने केलेल्या उपायांची विस्तृत माहिती घेतली. ओयो हॉटेल्स अँड होम्स ने महाराष्ट्रात उपलब्ध केलेल्या संधी आणि निर्माण केलेले रोजगार तसेच उद्यजकांना उत्तेजन देण्यासाठी केलेले प्रयत्न यांची माहिती कंपनीतर्फे देण्यात अली.  

पर्यटन व्यवसायातील नव्या प्रवाहांची तसेच पर्यटकांच्या अपेक्षांची दखल घेऊन ओयो हॉटेल्स अँड होम्स ने मे  २०२० मध्ये युनिलिव्हर च्या सहकार्याने सॅनिटाइज्ड स्टे हा स्वच्छता आणि आरोग्य राखण्यासाठीचा उपक्रम आयोजित केला. त्यानंतर कंपनीने महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या आणि ओयो हॉटेल चा सदस्य हॉटेल मालक असलेल्या सोनू सूद या बॉलिवुड अभिनेत्याचा सहभाग असलेली  “स्वच्छता प्रत्यक्ष पाहून खात्री करा” (एस बी वाय इ  – सॅनिटाईज्ड बिफोर युवर आइज ”) ही मोहीमही हाती घेतली. या मध्ये पर्यटकांनी मागणी केल्यास हॉटेल मधील अधिक वावर असलेले भाग त्यांच्या डोळ्यासमोर जंतुनाशक फवारे किंवा यंत्राद्वारे वापरून स्वच्छ केले जातात. 

Leave a Reply

%d bloggers like this: