लकडीपूल विठ्ठल मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे : श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि स्व. निखिल पाटील मित्र परिवाराच्या निखिल पाटील यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन टिळक चौकातील श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर परिसरात करण्यात आले होते. ५०  पेक्षा अधिक तरुणांनी यावेळी रक्तदान केले. आचार्य आनंद ऋषी ब्लड बँकेने रक्ताचे संकलन केले.
शिबिराचे उद्घाटन अखिल मंडई मंडळाचे सचिव विश्वास भोर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी  मंदिराचे अध्यक्ष दिलीप काळभोर, कार्याध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दिपक थोरात, नरेंद्र गाजरे,बाळासाहेब ताठे, महेश अंबिके,रमेश मणियार उपस्थित होते. विनायक लाटे आणि मित्र परिवाराने शिबिराचे आयोजन केले होते. 

Leave a Reply

%d bloggers like this: