दारूच्या दुकानांना परवानगी देता, मग रामलीला आयोजनास परवानगी देण्यास काय हरकत ?

छावा मराठा संघटनेचे रामभाऊ जाधव यांचा सरकारला सवाल

पिंपरी, दि. १९ –  महसूल मिळतो म्हणून नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करीत दारू दुकानांना परवानगी देता. मग नियम अटी लागू करून रामलीला आयोजनास परवानगी देण्यास काय हरकत आहे, असा सवाल छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी राज्य सरकारला केला आहे.           

महाराष्ट्रात रामलीलेची मोठी परंपरा आहे. सध्याच्या कोरोना काळातही रामलीला अतिशय सहजपणे आयोजित केली जाऊ शकते. त्यामुळे रामलीला आयोजित करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केली आहे.         

राज्यात दरवर्षी रामलीला मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येतात. हिंदू संस्कृतीत त्याला विशेष महत्त्व आहे. यंदा कोरोनाची भयानक परिस्थिती आहे, हे नाकारून चालणार नाही. परंतु अगदी सुरक्षितपणे रामलीला आयोजित केल्या जाऊ शकतात. राज्य सरकारने सोशल डिस्टन्सच्या नियमासह इतर नियम अटी लागू करून परवानगी द्यावी. राज्याला चांगला महसूल मिळतो म्हणून स्वार्थापोटी एकीकडे दारूची दुकाने चालू करण्यात आली. इथे तर अनेक व्यक्तींचा एकमेकांशी थेट संपर्क येत असल्याचे दिसते. सर्वच ठिकाणच्या दारूच्या दुकानांत गर्दी दिसते. सोशल डिस्टन्स नावालाही नसते. असे असतानाही दारूची दुकाने चालू करण्यास परवानगी दिली आहे.  तर सुरक्षितपणे आयोजन करण्याच्या अटी नियम लागू करून रामलीला आयोजनास परवानगी देण्याचे सौजन्य राज्य सरकारने दाखवावे, अशी मागणी रामभाऊ जाधव यांनी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: