मोफत संगणक प्रशिक्षण वर्गाचा समारोप 

पुणे : पी ए इनामदार आय सी टी अकॅडमी तर्फे आयोजित दहा दिवसीय संगणक प्रशिक्षण वर्गाचा समारोप गुरुवारी आझम कॅम्पस येथे झाला. भिवंडी येथील शिक्षकाना हार्डवेअर,सॉफ्टवेअर, इंग्रजी संभाषण, कौशल्ये , सायबर सुरक्षा विषयक प्रशिक्षण देण्यात आले. उत्तम रित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रथम ३ शिक्षकांना अनुक्रमे १० हजार ,५ हजार आणि ३ हजाराचे पारितोषिक  डॉ पी ए इनामदार  यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ऍकेडमीच्या संचालक मुमताज सय्यद, अरिफ सय्यद ,अंजुम काजळेकर ,आलिया शेख ,आसिया लकडे ,राबिया गोडिकत, नसरीन शेख, शेहनाज शरीफ, अतिया शेख उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: