मराठी चित्रपटसृष्टीला उद्योगाचा दर्जा देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : ‘मराठी चित्रपट सृष्टीला उद्योगाचा दर्जा देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून लवकरच त्याबाबत निर्णय जाहीर केला जाईल’,असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिले. 
राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने अजित पवार यांना चित्रपट सृष्टी आणि कलाकारांच्या समस्यांबाबत निवेदन देण्यात आले . तेव्हा हे महत्वपूर्ण आश्वासन त्यांनी दिले. प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील, समन्वयक संतोष साखरे, अभिनेते आणि प्रदेश उपाध्यक्ष विजय पाटकर, अभिनेत्री आणि प्रदेश सरचिटणीस सविता मालपेकर, अभिनेत्री आणि पुणे जिल्हाध्यक्ष प्रिया बेर्डे, व विद्या म्हात्रे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन अनेक समस्यांबाबत चर्चा केली. 
राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी चित्रपट सृष्टीला इंडस्ट्रीचा दर्जा मिळावा,तसेच मुंबई, पुण्यात,कोल्हापूर,नाशिक या शहरांमध्ये कलाकारांसाठी कलाकार भवन उभं करावं,ज्येष्ठ कलाकारांचे मानधन  तीन हजार आहे ते  15 हजार रुपये महिना असे करावे,तसेच राज्यातील चित्रपटगृहे बंद असताना देखील आकारला गेलेला  स्थानिक मालमत्ता कर, सरसकट देण्यात आलेले वीज  बिल  माफ करावे किंवा त्याच्यामध्ये सूट द्यावी,वेळ  द्यावा, सिडको आणि म्हाडा येथे राखीव कोट्यातून कलाकारांना घरे मिळावी अशा मागण्याचे निवेदन  अजित पवार यांना देण्यात आले.   
 राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील, समन्वयक संतोष साखरे, प्रदेश उपाध्यक्ष विजय पाटकर, प्रदेश सरचिटणीस सविता मालपेकर, पुणे जिल्हाध्यक्ष प्रिया बेर्डे, व विद्या म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आणि चर्चा केली. 
‘संबंधित मंत्र्यांशी आणि प्रमुख सचिवांशी बोलून लवकर आदेश काढू .आतापर्यंत कोणीच ही मागणी शासनाकडे आणली नाही,त्यात राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट सांस्कृतिक विभाग पाठपुरावा करीत आहे,त्यामुळे शासन तातडीने निर्णय घेईल’, असे अजित पवार यांनी सांगितले.
 ‘हिंदी, दक्षिण, भोजपुरी चित्रसृष्टीला उद्योगाचा दर्जा असून मराठी चित्रपटसृष्टी मात्र वंचित राहिली होती म्हणून आम्ही प्राधान्याने ही मागणी उप मुख्यमंत्र्यांकडे मांडली.कला आणि कलाकारांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करू’,असे बाबा पाटील यांनी सांगितले. 

Leave a Reply

%d bloggers like this: