fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

६० कलाकार, तंत्रज्ञ, बॅक स्टेज आर्टिस्टना जीवनोपयोगी साहित्याचे वाटप

पुणे : धनंजय नाईक,सौ. गायत्री नाईक मित्र परिवारातर्फे ६०  कलाकार, तंत्रज्ञ, बॅक स्टेज आर्टिस्टना जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. ‘प्रबोधन माध्यम ‘ चे संचालक दीपक बीडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते . रंगभूमी सेवक संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गोखले, निर्माते अशोक नाईकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कुमार पाटोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. बुधवारी सायंकाळी सुखसागरनगर येथे हा कार्यक्रम पार पडला.
 ‘कलाकारांनी कोरोना विषाणू साथीमुळे उपजीविका बंद असताना परिस्थितीला धैर्याने तोंड दिले. लवकरच हे कसोटीचे दिवस संपतील आणि कलेचे दिवस परत येतील . या कठीण परिस्थितीत कलाकार ,तंत्रज्ञ आणि बॅक स्टेज आर्टिस्ट ना मदतीचा हात आणि मोलाची साथ देणाऱ्या देण्याचे उपक्रम महत्वपूर्ण आहेत. समाजपुरुषाने खंबीरपणे कलेच्या पाठीशी राहावे ‘,असे आवाहन दीपक बीडकर यांनी केले. 
‘कलाकारांनी विपरीत परिस्थितीत मनोधैर्य गमावू नये .वेडेवाकडे पाउल उचलू नये . कठीण दिवस सतत राहत नाहीत. हेही दिवस जातील असा आशावाद बाळगावा ‘ असे मनोगत अशोक नाईकरे यांनी व्यक्त केले. 
‘मित्रांना केलेल्या आवाहनातून देश -विदेशातून आलेल्या मदतीतून नाईक परिवार मार्च पासून काही ना काही मदत करीत आला आहे.  विविध समाज घटकांना मदत देण्याचा आमचा प्रयत्न राहील’ ,असे धनंजय नाईक यांनी सांगितले . 
‘नवरात्र ,दसरा ,दिवाळी हे कलाकारांना व्यासपीठ देणारे दिवस असल्याने राज्य सरकारने तातडीने मनोरंजनाच्या कार्यक्रमांना परवानगी देवून कलाकारांच्या अडचणी सोडवाव्यात ‘,अशी मागणी कुमार पाटोळे यांनी केली . 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading