एम सी ई सोसायटीमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

पुणे- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक आस्थापनांमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लर्निंग टूर चे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य शैला बुट्वाला,ग्रंथपाल नूरजहान शेख यांनी आयोजन केले. रंगूनवाला दंत रुग्णालयामध्ये ‘ऑनलाइन रीडिंग’ उपक्रम आयोजित करण्यात आला. प्राचार्य रमणदीप दुगल यांनी मार्गदर्शन केले.ग्रंथपाल निरोप निलोफर सिद्दिकी यांनी संयोजन केले. अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल मध्ये विद्यार्थिनी शिफा शेख हिचे ‘वाचनाचे महत्व’ या विषयावर व्याख्यान झाले. प्राचार्य परवीन शेख,संदीप जगदाळे आणि ग्रंथपाल अस्मा शेख उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: