बीएसएनएल – प्रलंबित बिलांच्या मागण्यासाठी ठेकेदाराकडून निवेदन, बिल न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

पुणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातील सर्व ग्रामपंचायती डिजिटल स्वरूपात जोडण्यासाठी (एनओएफएन प्रकल्प अंतर्गत) संपूर्ण राज्यामध्ये काम सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत ऑप्टिकल फायबर केबलची कामे निविदा प्रक्रिये नुसार शासनाच्या अधिकृत कॉन्ट्रॅक्टर व ठेकेदारांना देण्यात आलेली होती.

सन 2016 ते 2019 पर्यंत कामांसाठी आवश्यक सर्व लेबर खर्च तसेच नियमानुसार जीएसटी व इतर शासकीय शुल्क संबंधित ठेकेदाराकडून अदा करण्यात आलेले आहे. मात्र केलेल्या कामाची बीले बीएसएनएल कडून मागील एक वर्षांपासून अद्याप अदा करण्यात आलेली नाहीत. वेळोवेळी पाठपुरावा करून देखील थकित बिलांच्या रकमा देण्यासाठी विलंब होत आहे. सदरची थकीत बिले मिळावी या मागणीसाठी पुणे जिल्ह्यातील ठेकेदारांनी मागणीचे निवेदन बीएसएनएलचे महाप्रबंधक यांना दिले. केंद्र शासनाकडून बीएसएनएलला प्रकल्पासाठी आलेला निधी मिळून देखील तुझ्या दारा नियमानुसार केलेल्या कामाचे पैसे अनेक दिवसांपासून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सदर बिलाची रक्कम त्वरित मिळावी या मागणीसाठी ठेकेदारांनी हे निवेदन दिले. केलेल्या कामांची बिले एक वर्षांपूर्वी सादर करून देखील अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. सदरची बिले आठ दिवसात न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा या निवेदनाद्वारे यावेळी देण्यात आलेला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: