जम्बो हॉस्पिटल हेच ज्येष्ठांचे आशास्थान

पुणे : जम्बो कोविड हॉस्पिटलमधून खडखडीत बरे होऊन घरी जाणाऱया रुग्णांचे प्रमाण 60 टक्क्यांहून अधिक झाले आहे. त्यातही ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर खास कोरोनाबाधीत रुग्णांच्या उपचारांसाठी जम्बो कोविड हॉस्पिटल कार्यान्वित करण्यात आले आहे. दीपाली डिझाईन एक्सिबिट प्रायव्हेट लिमीटेड कंपनीतर्फे हे हॉस्पिटल चालविण्यात येत आहे. आतापर्यंत या रुग्णालयात 1,192 रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले. त्यापैकी 713 रुग्ण (60 टक्के) पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यापैकी काही रुग्णांनी त्यांच्या संपर्कातील नातेवाइकांना, मित्रांना जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला.

या बाबत बोलताना जम्बो हॉस्पिटलमधून बरे होऊन घरी जात असलेले वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले कोरोनामुक्त नागरिक म्हणाले, “दम लागत होता. दोन वाक्यही बोलून शकत नव्हतो. दहा पावलं चालू शकत नव्हतो. अशा अवस्थेत जम्बो हॉस्पिटलमध्ये मला दाखल केललं. 14 दिवस डॉक्टरांनी दिवस-रात्र उपचार केले. आता मी घडाघडा तुमच्याशी बोलत आहे. स्वतःच्या पायावर चालत रुग्णालयाच्या बाहेर पडतं आहे. याच रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेऊन बाहेर आलो. आता माझ्या नातेवाइक आणि मित्रांनाही कोरोना झाल्यानंतर या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठ पाठवणार आहे.”

जम्बो हॉस्पिटलमध्ये सध्या 314 रुग्णांवर (26 टक्के) उपचार सुरू आहेत. त्यापैकी काही रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. तर, काही रुग्णांवर आँक्सिजन वार्डमध्ये उपचार होत आहेत. त्यांना आवश्यक असणाऱया बहुतांश सर्व औषधांचा पुरवठा येथे केला जातो. त्यासाठी कोणतेही पैसे रुग्णाच्या नातेवाइकांकडून आकारले जात नाहीत. अत्यवस्थ असताना रुग्णालयात दाखल झालेल्या, इतर आजार असलेल्या किंवा उपचारासाठी उशिरा दाखल झालेल्या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी जम्बो हॉस्पिटलमधील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकष्टा केली. मात्र, रुग्णांच्या शरीराने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे 165 (14 टक्के) रुग्णांचा यात मृत्यू झाला.

वयाच्या वीसपेक्षा कमी वर्षाच्या 13 रुग्णांवर येथे उपचार करण्यात आले. 21 ते 40 वर्षे वयांच्या 230 रुग्णांवर येथे उपचार केले असून, सर्वाधिक 41 ते 60 वयोगटातील सर्वाधिक रुग्णांना उपचारांसाठी येथे दाखल केले आहे. त्याची संख्या 486 आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयांच्या 463 जणांवर उपचार करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: