पुस्तक वाचनातून डॉ. अब्दुल कलामांना अभिवादन

वाचन प्रेरणा दिवसानिमित्त ‘सुर्यदत्ता’च्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम
पुणे : सलग एक तास सव्वाशे ते दीडशे लोकांनी मिसाईलमॅन भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या ‘इग्नायटेड माईन्ड्स’ आणि ‘टर्निंग पॉईंट्स’ या पुस्तकाचे वाचन करून त्यांना अभिवादन केले. डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधील  शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे वाचन करीत वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा केला.

कोरोनामुळे महाविद्यालयात विद्यार्थी नसले तरी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून नियमितपणे सर्व दिवस नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरे केले जात आहेत. वाचन प्रेरणा दिवसानिमित्त डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर व ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समूह संचालक डॉ. शैलेश कासंडे, अधिष्ठाता डॉ. प्रतीक्षा वाबळे, प्रा. शेफाली जोशी, प्रा. अभिजित नायर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: