सोनी सबवरील नवीन मालिका ‘काटेलाल अॅण्ड सन्स’मधील दोन बहिणींची पहिली झलक
सोनी सब चॅनेलने नवीन मालिका ‘काटेलाल अॅण्ड सन्स’सह मालिकांचा ताफा वाढवला आहे. ही प्रेरणादायी कथा प्रेक्षकांना ‘स्वप्नांना कोणतेच बंधन नसते’ यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडेल.
वास्तविक कथेमधून प्रेरित ‘काटेलाल अॅण्ड सन्स’ ही धरमपाल ठाकूर आणि त्याचे हेअर सलून ‘काटेलाल अॅण्ड सन्स’ची कथा आहे. हरियाणातील रोहतक येथील पार्श्वभूमीवर आधारित ही मालिका प्रेक्षकांना या कुटुंबाच्या जीवनामध्ये, विशेषत: धरमपालच्या लाडक्या व धाडसी मुली – गरिमा व सुशीला यांच्या जीवनामध्ये घेऊन जाते.
मालिकेने गरिमा व सुशीला या दोन धडाकेबाज बहिणींची भूमिका साकारण्यासाठी अनुक्रमे मेघा चक्रवर्ती व जिया शंकर या प्रतिभावान अभिनेत्रींची निवड केली आहे. प्रतिभावान अभिनेता अशोक लोखंडे धरमपालची भूमिका साकारणार आहे. गरिमाचे शौर्य व सुशीलाच्या स्त्रीत्वासह दोन्ही बहिणी सामाजिक रूढींना आव्हान करण्यास आणि त्यांची स्वप्ने व आवडींना वास्तविकतेमध्ये बदलण्यास सज्ज आहेत.
मालिकेबाबत अधिक जाणून घेण्यास उत्सुक आहात का? त्यासाठी अधिक काळ प्रतिक्षा करावी लागणार नाही. तोपर्यंत मालिकेची पहिली झलक पाहा.