लायन्स क्लबतर्फे पिस पोस्टर स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेमध्ये ६५ शाळा आणि ४५०० विद्यार्थी सहभागी

‘सेवेतून शांती’ विषयाद्वारे तरुणांच्या मनातील सेवा आणि शांतीच्या भावना समाजासमोर आणण्याचा उपक्रम…

पुणे, दि. १३ : आंतरराष्ट्रीय लायन्स  संघटनेकडून दरवर्षी पीस पोस्टर स्पर्धा आयोजित केली जाते. ११ ते १३ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा होतात. “सेवेतून शांती” हा यावर्षीचा विषय होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी स्पर्धा ऑनलाईन घेतल्या गेल्या. २५ लायन्स क्लबअंतर्गत येणा-या तब्बल ६५ शाळा आणि ४५०० विध्यार्थ्यांचा सहभाग होता. या स्पर्धेच्या 2 फेऱ्या झालेल्या असून अंतीम फेरी १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.  राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात, जयहिंद लोक चळवळीचे  संस्थापक अध्यक्ष आमदार सुधीरजी तांबे,  समन्वयक संदीपजी खताळ, लायन उत्तमराव जगधने यांच्या मार्गदर्शनाखाली व  प्रभाकर शेलार, वैष्णवी कापसे यांच्या सहकार्याने घेण्यात या स्पर्धा घेण्यात आल्याची माहिती उपक्रम प्रमुख सीमा दाबके यांनी दिली.

कोरोनामुळे निर्माण झालेला आर्थिक, सामाजिक, मानसिक ताणतणाव यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे ‘मन:शांती’. तरुणांच्या मनातील शांततेच्या विषयी असणा-या भावना त्यांनी रेखाटलेल्या चित्रांमधून  समाजासमोर याव्यात या उद्देशाने ‘सेवेतून शांती’ हा विषय घेऊन स्पर्धा घेण्यात आल्याचे लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रीक्टचे प्रांतपाल अभय शास्त्री म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: