अॅमवे इंडिया नारी शक्ती प्रकल्प सुरू करून उद्योजकतेला प्रोत्साहन देत आहे
मुंबई, दि. 13 – महिलांना सर्वांसमोर आणून सशक्तीकरण करण्याचे वचन देत आणि देशातील गिग इकॉनॉमी इकोसिस्टमला (मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्थेला) मजबूत करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यासाठी देशातील आघाडीच्या एफएमसीजी थेट विक्री कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅमवे इंडियाने ‘नारी शक्ती’ या प्रकल्पाची घोषणा केली आहे. त्यांच्या 10 वर्षांच्या वाढीच्या दृष्टीकोनाचा एक भाग म्हणून, अॅमवेने स्त्रियांना सक्षम बनविणे आणि तंदुरुस्ती, निरोगी जीवन, स्वयंपाक किंवा सौंदर्य यासाठी त्यांच्या आवडीचे जीवन जगत असतांनाच स्वत: चा व्यवसाय करण्याची संधी देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. पूर्व भागापासून सुरुवात करुन नारी शक्ती प्रकल्पाचे लक्ष्य अॅमवेच्या विद्यमान महिला थेट विक्रेत्यांच्या गटास त्यांचे स्वतंत्र अॅमवे व्यवसाय यशस्वीरित्या चालविण्यासाठी त्यांची विद्यमान कौशल्ये वाढवून पुढे आणणे आहे.
या उपक्रमावर भाष्य करताना अॅमवे इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंशु बुधराजा म्हणाले, “सध्याच्या आरोग्याच्या संकटामुळे, नोकरीच्या क्षेत्रातीलल अनिश्चिततेमुळे गिग इकॉनॉमी इकोसिस्टममध्ये फ्लेक्सिबल रोलचे प्रमाण वाढले आहे. भारताच्या सध्याच्या सामाजिक-आर्थिक लँडस्केपला बळकटी देण्यासाठी महिला महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत आणि अॅमवे महिलांच्या उत्कर्षासाठी आणि एका मोठ्या काळापासून समान संधी पुरवण्यासाठी कार्यरत आहे. आमचा विश्वास आहे की महिला उद्योजक हे भारताच्या भविष्यातील प्रमुख बाब आहे आणि आम्ही विकासाचे पोषक वातावरण वाढविण्यासाठी आणि महिलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी योग्य संधी देण्यास वचनबद्ध आहोत. आमच्या थेट विक्रेत्यापैकी 60% पेक्षा अधिक महिला आहेत, ही वस्तुस्थिती आमच्या बांधिलकीची साक्ष आहे. नारी शक्ती प्रकल्प सुरू करतांना मला खूप आनंद होत आहे, जो आणखी इतर महिलांमध्ये उद्योजकतेची भावना उद्युक्त करण्यासाठी सज्ज आहे. या प्रकल्पाला किकस्टार्ट करण्यासाठी आम्ही काही विशिष्ट पॅरामीटर्सच्या आधारे निवडक महिला उद्योजक ओळखले आहेत आणि येत्या काही महिन्यांत आपली पोहोच आणखी वाढविण्याचे आमचे लक्ष्य आहे.
अॅमवेने महिला उद्योजकांच्या या निवडक संचासाठी विविध सत्रांची योजना आखली आहे, ज्यांचा उद्देश त्यांचे कौशल्य संच वाढविणे, उत्तम व्यवसाय पद्धतींबद्दल ज्ञान, उत्पादनांचे प्रशिक्षण आणि विविध व्यवसाय साधनांचा वापर आणि सामाजिक वाणिज्य यांचा वापर करणे हे आहे. या महिलांचे मार्गदर्शन ज्येष्ठ महिला उद्योजक करतील आणि अॅमवे इंडियासमवेत त्यांच्या प्रवासात मार्गदर्शन करतील. या प्रकल्पात सध्याच्या वातावरणात सामाजिक विक्रीच्या महत्त्वावर देखील जोर देण्यात आला आहे आणि व्यवसाय टिकवण्यासाठी डिजिटल माध्यमांच्या वेगवान अवलंबनावर आणि थेट विक्रीच्या पारंपारिक मार्गांच्या पलीकडे जाण्यावर प्रकाश टाकला आहे.
विविध उद्योगांमधील महिलांच्या विकसनशील भूमिकेच्या विषयावर पॅनेल चर्चेसह हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे आणि देशातील महिला उद्योजकतेचे भवितव्य बळकट होण्यामुळे गिग इकॉनॉमी इकोसिस्टमच्या वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. एक यशस्वी फॅशन डिझायनर श्रीमती. बिंद्रा आणि त्यांच्या कौशल्याच्या क्षेत्रात 6 वर्षापेक्षा अधिक समृद्ध अनुभव असणाऱ्या पुरस्कार विजेत्या प्रमुख वक्त्या; श्रीमती रीटा गंगवानी, सशस्त्र सैनेच्या सेवानिवृत्त अधिकारी आणि रीटा गंगवाणी यांच्या व्यक्तिमत्त्व परिवर्तनाच्या सभागृहाच्या संस्थापक; अॅमवे इंडिया येथील कंटेंट मार्केटिंग अँण्ड कम्युनिकेशन्स, पीआर, सोशल मीडिया आणि सीएसआरच्या उपाध्यक्षा श्रीमती सिमरत बिश्नोई आणि अॅमवे इंडिया येथील सौंदर्य, वैयक्तिक काळजी आणि समुदायाच्या उपाध्यक्षा उपाध्यक्षा अनिशा शर्मा व्हर्च्युअल पॅनेल चर्चेला उपस्थित आहेत. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचे संतुलन राखत महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी थेट विक्रीवर व्यवहार करणे, यावर चर्चेत भर देण्यात आला आहे. व्हर्च्युअल पॅनेल चर्चेस उपस्थित असलेल्या मेंटर्सनी वैयक्तिक अनुभव आणि यशोगाथा सामायिक केल्या, ज्यायोगे महिलांना वाढीस आणि यशस्वी होण्यास प्रेरणा मिळेल. या ज्येष्ठ नेत्यांनी आपला प्रवास, प्रेरणा आणि यशाचे मंत्रही सांगितले. याव्यतिरिक्त, अॅमवेचे ज्येष्ठ थेट विक्रेते त्यांचा अनुभव आणि प्रवास सामायिक करण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमधील वेबिनारचा भाग होते.