‘दगडूशेठ’ गणपतीसमोर मुद््गलपुराणातील गणेशस्तुती व यज्ञ-यागाद्वारे अधिक मासानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांची सांगता

पुणे : श्री गणेशाची स्तुती असलेल्या विविध स्तोत्रांचे पठण व यज्ञ-यागाद्वारे दगडूशेठ गणपती मंदिरातील सलग १५ दिवस सुरु असलेल्या धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली. विविध देवता आणि ॠषीमुनींनी केलेल्या मुद््गलपुराणातील विविध स्तोत्रांचे पठण व हवन करण्यात आले. जागतिक स्तरावर उद््भविलेल्या कोरोना महामारीचा मुकाबला करण्याकरीता बळ मिळावे आणि प्रत्येकाचे आरोग्य उत्तम रहावे, याकरीता हे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे ढुंडीराज तथा अधिक मासानिमित चार वेदांच्या संहितेचे पठण व यज्ञ-यागांचे आयोजन मंदिरामध्ये करण्यात आले होते. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर यांच्या पौरोहित्याखाली श्री गणेशाची स्तुती असलेल्या विविध स्तोत्रांचे पठण व हवन करण्यात आले.
मागील १५ दिवसांमध्ये ॠग्वेद, यर्जुवेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांच्या संहिता पारायणासह गणेश याग, नवचंडी हवन आदी धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत पार पडले. कोरोनाच्या निर्वाणार्थ संपुटीत सप्तशती पाठ, देवी राजोपचार पूजा, सहस्त्रकुंकुमार्चन, नवार्ण पूजन आणि चंडीहवन व पूर्णाहुती असे धार्मिक कार्यक्रम झाले.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, कोरोनाच्या जागतिक महामारीचे निवारण करण्याकरीता व जनकल्याणार्थ सर्वांना उत्तम आरोग्य प्राप्त होण्याकरीता आणि गणेश कृपा होण्याकरीता माता सिद्धी-बुद्धी यांच्याकडे संकल्प करण्यात आला आहे. अधिक मासामध्ये केलेली प्रार्थना अधिकस्य अधिकम फलम या उक्तीप्रमाणे अधिक प्रमाणात गणरायापर्यंत पोहोचते, या श्रद्ध्ेने या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर बंद असून ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्विटर या माध्यमांद्वारे भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.

Leave a Reply

%d bloggers like this: