मुंबई पोलिसांची अर्णब गोस्वामीला कारणे दाखवा नोटीस

मुंबई, दि.13 – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये त्यांनी ‘पूछता है भारत’ शो मध्ये समाजामध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये अटक का करू नये? अशी विचारणा केली आहे. पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीवर अर्णब गोस्वामी यांना प्रक्षोभक वक्तव्य करणार नाही, असे लेखी बंधपत्र द्यावे लागणार आहे. तसेच १० हजार रुपये जामिनासाठी भरावे लागणार आहे. जामिनदार अर्णब यांच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवणारे हवेत, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग पत्रकार परिषद घेत टीआरपी घोटाळ्याबाबत खुलासा केला होता. यामध्ये त्यांनी वृत्तवाहिन्यांना BARC कडून रेटिंग मिळत असते. बार्कच्या रेटिंगशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला. BARC ने हंसा एजन्सीला रेटिंगच्या तपासासाठी नेमले होते. हंसा एजन्सीने एक सर्व्हे केला त्यात आढळले की काही लोक गरिब कुटुंबाना पैसे देऊन काही वृत्तवाहिन्या दिवसभरासाठी सुरु ठेवण्यास सांगत होते. त्याबदल्यात त्यांना पैसे दिले जायचे. या प्रकरणी फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा यांच्या मालकांना अटक करण्यात आले आहे. तसेच रिपब्लिक टीव्हीसाठी हा घोटाळा करण्यात आल्याचेही यावेळी आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले होते. त्यानंतर या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: