धान्य वितरण कार्यालयावर भीम आर्मी एकता मिशन चा रेशनिंग मोर्चा

पुणे, दि. 8 -/रेशनिंग नसेल तर रेशनिंग कार्ड कशाला ,पुण्यातील अन्न धान्य वितरणातील भ्रष्टाचार विरोधात अन्न धान्य वितरण कार्यालयावर भीम आर्मी एकता मिशन चा रेशनिंग मोर्चा

सरकारने दिलेल्या रेशन कार्ड वर जर रेशन मिळत नसेल तर सरकारने दिलेले रेशन कार्ड परत देण्यासाठी पुण्यातील अन्नधान्य वितरण कार्यालयावर भीम आर्मी एकता मिशनच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला. रेशनिंगच्या संदर्भात काळाबाजार चालू असून रेशन दुकानदार संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत करून अन्नधान्य वितरणामध्ये भ्रष्टाचार करत आहेत.

गोरगरीब जनतेला धान्य मिळत नाही रेशन दुकानदारांचा काळा बाजार सुरू असून भ्रष्टाचार करणार्‍या दुकानदारांवर मोक्कांतर्गत कारवाई करावी. रेशनिंग ची व्यवस्था बचत गट मार्फत चालवावी आणि अन्न सुरक्षा ची प्रक्रिया सुलभ करावी आदी मागण्यांसाठी भीम आर्मी बहुजन मिशनचे अध्यक्ष दत्ता पोळ यांच्या नेतृत्वाखाली पुणे स्टेशन ते सेंट्रल बिल्डिंग येथील अन्नधान्य वितरण कार्यालयावर रेशनिंग मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चामध्ये भ्रष्टअधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि सरकारने दिलेले रेशन कार्ड हातात घेवुन वितरण कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. जर यावर कोणताही निर्णय घेतला नाही तर शहरातील गोरगरीब जनतेला घेऊन बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा दत्ता पोळ यांनी दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: