“टीव्ही वाहिन्यांच्या” TRP घोटाळ्यावर माहिती नभोवाणी मंत्र्यांचे अक्षम्य दुर्लक्ष कसे…(?) काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचा प्रकाश जावडेकरांना सवाल..!

पुणे दि. ८ – “टीव्ही – वृत्तवाहिन्यांमध्ये सुरु असलेला महाभयंकर टीआरपी घोटाळा” मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला, त्याबद्दल मुंबई पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन..! वास्तविक टीव्ही वाहिन्यांच्या या घोटाळ्या कडे “केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे” आणि त्यांच्या मंत्र्यांचे लक्ष हवे होते. परंतु ‘करोडोंच्या या घोटाळ्यांस’ पाठीशी घालण्याचीच केंद्र सरकार भूमिका घेत होते, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे.
मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून काही निवडक “वृत्तवाहिन्यांची एकांगी, लहरीपणाची व प्रसंगी टोकाची भूमिका धेण्यात वाढ झाली असुन, “सामाजिक वातावरण” सोईने प्रक्षोभक बनवण्याची वृत्ती देखील बळावल्याचे निदर्शनास येते..!
देशापुढील “ज्वलंत समस्या व महत्वाचे प्रश्न” दूर सारून, स्वतःच् एखादा विषय उपस्थित करायचा आणि त्यावरून कुभांडखोरी करून देशाचे लक्ष विचलित करायचे व केवळ आणि केवळ केंद्र सरकारची चमचेगिरी करायची अशी एकांगी आणि किळसवाणी पत्रकारिता गेले काही दिवस या वाहिन्यांमध्ये सुरू होती.
“पत्रकारीतेच्या मुळ धर्मा पासून” लांब जाऊन, हव्या त्या विषयावर “मिडीया ट्रायल” घडवून आणायची व “न्यायालयीन व पोलीस प्रशासनिक तपास यंत्रणांचे प्रयत्न मोडीत काढण्याचे प्रयत्न करून, आपणास हवा तो नॅरेटीव्ह(कथा-वृत्तांत) निर्माण करायचा” व त्या आधारे मोठ्या कंपन्या व जाहीरात दारांचा पैसा लूबाडायचा असा प्रकार सर्रास चालला होता हेच मुंबई पोलीसांनी पुढे आणले आहे..
रिपब्लिक’ टीव्ही नावाच्या एका वृत्तवाहिनीने यावर
कळस चढवला. मुंबई पोलिसांनी व पोलीस आयुक्तांनी उघडकीला आणलेला हा “टी आर पी घोटाळा” स्वतंत्र भारतातील पहिला घोटाळा असुन याची थेट जबाबदारी या खात्याचे मंत्री म्हणून मा प्रकाश जावडेकर यांच्या कडे जाते.. त्यांचे खात्या कडून हा मोठा घोटाळा दुर्लक्षित कसा झाला(?) याचा खुलासा संबंधित खात्याचे मंत्री नात्याने जबाबदारी घेऊन त्यांनी केलाच पाहिजे अशी मागणी गोपाळदादा तिवारी यांनी केली..!

Leave a Reply

%d bloggers like this: