केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे.रामविलास पासवान हे लोकजनशक्ती पार्टी (लोजपा) चे राष्ट्रीय अध्यक्ष होते.

त्यांचा पक्ष केंद्रातील मोदी सरकारमध्ये सहभागी आहे. 73 वर्षीय पासवान यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. तरी ते राज्यसभा सदस्य होते. बिहारच्या राजकारणात रामविलास पासवान यांचा मोठा दबदबा आहे. पासवान यांनी 1960 च्या दशकात राजकारणाची सुरुवात केली. पहिल्यांदा आमदार राहिलेल्या पासवान यांनी हाजीपूर मतदारसंघातून 4 लाख मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे ते देशभर चर्चेत आले होते.

1989 मध्ये विजयी झाल्यानंतर ते पहिल्यांदा व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते एच. डी. देवेगौडा यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. गुजरात सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री झाले. केंद्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी रामविलास पासवान हे केंद्रीय मंत्री असतात असा त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: