Thursday, June 18, 2026
PUNE

‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे रुग्णसेवेकरिता ८ वी रुग्णवाहिका रुजू

पुणे : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून कार्य करणा-या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडे ८ वी रुग्णवाहिका दाखल झाली आहे. यापूर्वी कोरोनाच्या काळात अहोरात्र सेवा देणा-या ७ रुग्णवाहिका विनामूल्य पुणेकरांसाठी कार्यरत होत्या. त्यामध्ये कै.गोविंदराव एकनाथ निम्हण यांच्या स्मरणार्थ देणगी म्हणून देण्यात आलेली आणखी एक रुग्णवाहिका रुग्णसेवेत रुजू झाली आहे. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी उत्सवकाळात कोतवाल चावडी येथे रुग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण यांसह देणगीदार व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. 
यापूर्वी ट्रस्टतर्फे शहर, उपनगर, जिल्हा व गरजेनुसार महाराष्ट्रामध्ये जाण्याकरीता या रुग्णवाहिकांची सोय होती. पुणे शहराकरीता या विनामूल्य रुग्णवाहिका विनामूल्य सेवा देत आहेत. तर, पुण्याबाहेर महाराष्ट्रात कोठेही जाण्याकरीता अत्यल्प खर्चात ही सेवा उपलब्ध करुन दिली जात आहे. सुसज्ज अशा रुग्णवाहिका  नागरिकांच्या सेवेत २४ तास उपलब्ध आहेत. आता यामध्ये ८ व्या रुग्णवाहिकेची भर पडली आहे. तरी नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात अनुभवा दगडूशेठ गणपतीची आरती
प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या स्वरांमध्ये गणेशोत्सवात दररोज दगडूशेठ च्या श्रीं ची आरती गणेशभक्तांना ऐकता येणार आहे. गणेश विसर्जनापर्यंत दररोज सकाळी ७.३० वाजता व रात्री ८ वाजता लाईव्ह मंगलआरती सुरु आहे. अनुराधा पौडवाल या ट्रस्टच्या सोशल माध्यमांमधून सुरु असलेल्या आरतीमध्ये सहभागी होत असून आरती म्हणत आहेत. तसेच गणेशाची भक्तीपर गीते देखील सादर करीत आहेत. त्यांच्या आवाजातील आरती आॅनलाईन स्वरुपात अनुभविण्याच्या संधी यानिमित्ताने गणेशभक्तांना मिळत आहे. 
श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.comhttp://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading