रायगड जिल्ह्यातील महाड येथे 5 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू
महाड, दि. 24 – येथील पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. काजळपुरा परिसरातील ही घटना असून अर्ध्या तासापूर्वी घडली आहे. माहितीनुसार, आठ ते दहा वर्षापूर्वीची ही इमारत असून तारीक गार्ड इमारतीचे नाव आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्ही २५ लोक सुखरुप बाहेर पडले होते. त्यानंतर आता १५ लोकांना बाहेर काढण्यात यश आले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या १५ लोकांना सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच आता या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ७० ते ८० लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. आपत्ती व्यवस्थापनेची टीम आणि फायर टेंडर या ठिकाणी पोहोचली असून बचाव कार्य सुरू आहे. पुण्याच्या एनडीआरएफच्या तीन टीम रवाना झाल्या आहेत.
आता या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून ८ जणांना बाहेर काढण्यात आले असून ७ जण जखमी आहे आणि एकाचा मृत्यू झाला आहे.
