Sunday, May 3, 2026
PUNE

Pune airport -विमानाच्या उड्डणांवर २६ ऑक्टोबरपासून मर्यादा

पुणे, दि. 14 -पुणे विमानतळाच्या धावपट्टीचे दुरुस्तीच्या कामामुळे 26 ऑक्टोबरपासून विमानाच्या उड्डणांच्या संख्येवर मर्यादा येणार आहे. दुरुस्तीचे काम हवाई दलाकडून १५ सप्टेंबरला सुरू होणार आहे.

येथील धावपट्टीची सध्या लांबी 2,530 मीटर आहे. तिच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्यावर ही लांबी सुमारे 2,133 मीटर होईल. त्यामुळे मोठ्या आकाराची विमाने पुण्यात उतरू शकणार नाहीत. हे दुरुस्तीचे काम सुमारे वर्षभर सुरू राहणार आहे.

सध्या संध्याकाळी 6 ते पहाटे 3 दरम्यान 15 विमानांची उड्डाणे होतात. 26 ऑक्टोबरपासून रात्रीची उड्डाणे बंद होतील. त्यामुळे लोहगाव विमानतळावर ताण येणार आहे.

विमानांची संख्या वाढली आहे. तसेच 2013 पासून धावपट्टीची दुरुस्ती झालेली नाही. मात्र, लोहगाव विमानतळावर दुरुस्तीला अनेक मर्यादा आहेत. हे विमानतळ संरक्षण दलासाठी आहे. त्यामुळे पुण्यासाठी नव्या विमानतळाची गरज आहे. लॉकडाउनपूर्वी लोहगाव विमानतळावरून विमानांची दररोज सुमारे 170 उड्डाणे होत असत. रोज सुमारे 25 हजार प्रवाशांची वाहतूक त्यातून होत होती. सध्या 8 शहरांसाठी विमानसेवा सुरू असून 25-30 विमान उड्डाणे होत आहेत. दरम्यान, लोहगाव विमानतळ प्रशासनाने या बाबत विमान वाहतूक कंपन्यांना या बदलाची माहिती दिली. त्यानुसार त्यांनीही त्यांचे नियोजन करणे सुरू केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading