तैमुर दादा बनणार, करीनाच्या गुड न्यूजवर सोशल मीडियावर मीम्सची बरसात
अभिनेत्री करीना कपूर पुन्हा आई बनणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. तसेच, या गुड न्यूज बाबत खुद्द सैफ आणि करिनाने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. ही गुड न्यूज बाहेर येताच, सोशल मीडियावर मीम्स पेजही सक्रीय झाले आहेत.

काही महिन्यांपूर्वीच करीनाचा ‘गुड न्यूज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तिला दुसऱ्यांदा आई होण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा “दुसऱ्या मुलासंदर्भातील आनंदाची बातमी सध्या आमच्याकडून नाही. आम्ही तैमुरबरोबर खूप आनंदात आहोत. आम्ही सध्या आमचे काम आणि तैमुरला अधिक वेळ देण्याच्या प्रयत्नात आहोत,” असं करिनाने म्हटलं होतं. मात्र आता करीनाने खरोखरंच कुटुंबीयांना व चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे.
तसेच, सोशल मीडियावरही या गुड न्यूजवर अनेक मीम्स तयार झाले आहेत.
