Thursday, June 11, 2026
ENTERTAINMENT

‘मॅडम सर’मध्‍ये मनोज चंदिला साकारणार लहानशी भूमिका

सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर’मध्‍ये अत्‍यंत प्रतिभावान अभिनेता मनोज चंदिलाचा प्रवेश होताना पाहायला मिळणार आहे. मनोज चंदिला मालिकेमध्‍ये प्रसिद्धी मिळवण्‍यासाठी आसुसलेला अभिनेता अजय कुमारची भूमिका साकारणार आहे. सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर’ चार डायनॅमिक महिला पोलिस अधिका-यांच्‍या दृष्टिकोनातून सामाजिक समस्‍यांना दाखवते. ही मालिका हलका-फुलका कन्‍टेन्‍ट आणि कलाकारांच्‍या प्रबळ अभिनयासह प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

मनोज चंदिला कॉप फ्रँचायझी चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला लोकप्रिय बॉलिवुड सुपरस्‍टार अजय कुमारच्‍या भूमिकेत ‘मॅडम सर’च्‍या आगामी एपिसोड्समध्‍ये प्रवेश करताना दिसणार आहे. तो शूटिंग करत नसताना देखील प्रसिद्धी मिळवण्‍यासाठी आसुसलेला आहे आणि त्‍याला नेहमीच लोकांमधील त्‍याची छबी व लुक्‍सबाबत चिंता असते.

अजय त्‍याच्‍या आगामी चित्रपटाच्‍या शूटिंगसाठी लखनौमध्‍ये येतो. त्‍याच्‍या मार्गामध्‍ये पुष्‍पा (सोनाली नाईक) गडदकाच असल्‍यामुळे त्‍याच्‍या कारला अडवते आणि त्‍याच्‍यावर दंड आकारते. अजयला या गोष्‍टीचा राग येतो आणि तो कार थांबवण्‍यासाठी पुष्‍पाचा अपमान करतो. अभिनेत्‍याकडून अपमानित झालेली पुष्‍पा तिच्‍या नोकरीचा राजीनामा देण्‍याचे ठरवते. दुसरीकडे एस.एच.ओ. हसीना (गुल्‍की जोशी) सर्वांना सांगते की, त्‍यांना अजय कुमारच्‍या सुरक्षिततेची जबाबदारी सोपवण्‍यात आली आहे आणि तो त्‍यांच्‍या महिला पोलिस थानासमोर शूटिंग करणार आहे. मॅडम सर व टीम अजय कुमारचे नखरे सहन करतात, पण एका बॉम्‍बचीभिती अजयच्‍या जीवनासाठी धोकादायक ठरते तेव्‍हा स्थिती गंभीर वळण घेते.

पुढे काय घडते आणि हसीना मलिक व तिची टीम अजय कुमारला कशाप्रकारे वाचवतात? आगामी एपिसोड्समध्‍ये या सर्व गोष्‍टींचा उलगडा पाहायला मिळेल.

अजय कुमारची भूमिका साकारणारा मनोज चंदिला म्‍हणाला,”सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर’चा भाग असण्‍याचा अनुभव अद्भुत राहिला आहे. मला मालिकेची संकल्‍पना आवडली आणि मी ही लहानशी भूमिका साकारण्‍याची संधी मिळाल्‍यामुळे स्‍वत:ला भाग्‍यवान समजतो. मी सुपरस्‍टार अजय कुमारची भूमिका साकारत आहे. ही एक जटिल भूमिका आहे आणि तो प्रसिद्धी व प्रतिष्‍ठा मिळवण्‍यासाठी आसुसलेला आहे. यासारखी भूमिका साकारण्‍याचा अद्वितीय अनुभव राहिला आहे. आगामी एपिसोड्स त्‍याला सामना कराव्‍या लागणा-या गंभीर स्थितींना दाखवतात. एका बॉम्‍बच्‍या भितीमुळे त्‍याच्‍या जीवनाला धोका निर्माण होतो. मी आशा करतो की,’मॅडम सर’चे प्रेक्षक आगामी एपिसोड्स पाहण्‍याचा आनंद घेतील. मी त्‍यांची प्रतिक्रिया जाणून घेण्‍यासाठी उत्‍सुक आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading