Thursday, June 11, 2026
PUNE

डॉ. द. दि. पुंडे यांना ‘मसाप’चा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार जाहीर

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वतीने, कै. डॉ. गं. ना. जोगळेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, दरवर्षी मराठी वाङ्मयक्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल मानाचा पुरस्कार दिला जातो. मराठीच्या अध्यापनाबरोबरच वाड्मयेतिहासाचे तत्त्वज्ञान या विषयासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल डॉ. द. दि. पुंडे यांना यावर्षीचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शुक्रवार दि. १४ ऑगस्ट २०२० रोजी डॉ. पुंडे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. पुंडे यांना प्रदान करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, पराग जोगळेकर आणि उज्वला जोगळेकर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading