fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

कापूरहोळ ते भोर रस्त्याला दादा कोंडके यांचे नाव द्या; संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे, दि. ८ – मराठी चित्रपट सृष्टीचे बादशहा दादा कोंडके हे महाराष्ट्राचं वैभव आहेत. मराठी चित्रपट सृष्टीचा ‘आरसा’ म्हणून दादांकडे पाहिलं जातं. भोर तालुक्याची शान कृष्णा उर्फ दादा कोंडके यांचा जन्म ८ ऑगष्ट १९३२ रोजी या विनोदी बादशहाचा जन्मदिवस भोर तालुक्यातील इंगवली येथे झाला. भोर ते गिनीज बुक विनोदाचा बादशहा, शाहीर
एकाच वेळी नऊ चित्रपट प्रदर्शित करुन वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड गिनिज बुक मध्ये नाव नोंदवणारे एकमेव दिग्दर्शक शाहीर दादा कोंडके यांना भोर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने नटसम्राट दादा कोंडके यांचे नाव कापुरहोळ ते भोर या मार्गाला (रस्त्याला) देऊन खरी खुरी आदरांजली देण्यात येत आहे.

दादा कोंडकेंनी चित्रपटसृष्टीतील घराणेशाही संपवली सर्वसामान्य कलाकार मोठा केला व झाला. विशिष्ट वर्गाच्या लॉबिंगला त्यांनी नेहमी लांब ठेवले. कारण त्यांनी क्वालिटीला खूप महत्त्व दिले. मात्र भोर तालुक्यातील राजकीय व सामाजिक नेतृत्व यांनी त्यांची कधीच किंमत केली नाही हे दुर्दैवी आहे. राज्यसरकारने दादा कोंडके यांचे मोठे राष्ट्रीय स्मारक भोर मध्ये करणे गरजेचे आहे. दादा कोंडके हे महाराष्ट्राचे भूषण आहेत.

भोर तालुक्यामध्ये या गावी मराठी चित्रपट सृष्टीला पडत्या काळामध्ये नऊ चित्रपट सुपरहिट दिले ते दादा कोंडके मुळेच. मराठी चित्रपट सृष्टीला चांगले दिवस दादा कोंडके यांच्यामुळे झालेले आहेत. भोर तालुक्यातील सुपुत्र दादा कोंडके साहेब यांच्यामुळेच त्यांच्या चित्रपटांनी सबंध महाराष्ट्राला थोड्या कालावधीत एकच भुरळ घातली. दादांना डोक्यावरती घेतलं आणि नट कसा असावा याचं अद्वितीय उदाहरण हे दादा कोंडकेंनी आपल्या कलेतून दाखवून दिलं. म्हणून ‘कापुरहोळ ते भोर फाटा ते भोर…’ दादा कोंडके नटसम्राट यांचे नाव देण्यात यावं… असे भोर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्य सरकारकडे मागणी आहे.

या मागणीचे निवेदन आज राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना ई-मेल द्वारे देण्यात आले आहे.

कापूरहोळ ते भोर रस्त्याला शाहीर, नटसम्राट मा. दादा कोंडके यांचे नाव द्या… अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे आणि भोर तालुका अध्यक्ष गणेश चऱ्हाटे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading