अभिनेता संजय दत्तला श्वास घेण्यास त्रास; लीलावती रुग्णालयात दाखल
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला श्वास घेण्यास त्रास होत असल्यांने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 61 वर्षीय संजय दत्त ची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे. डाॅ जलील परकार हे संजय दत्त यांच्यावर उपचार करत आहेत. उद्या यांच्यावर आणखी टेस्ट करण्यात येतील.