“फ्युचर ऑफ होम्स ” गृहसजावटीसाठी ऑनलाईन कॉमर्स पोर्टल भारतात पहिल्यांदाच
पुणे, दि. ७ – होम अँड डेकोर प्रकारातील भारतातील पहिल्या फिजीटल ई-कॉमर्स मार्केटप्लेस पोर्टलचे डिजिटल लॉन्ची्ग ७ ऑगस्ट २०२० रोजी झाले. दशकाहून अधिक काळापासुन सर्व प्रकारच्या गृहआवश्यक वस्तूंच्या खरेदिचे दालन बनलेले क्रिएटिसिटी आता डिजिटल कॉमर्सला चालना देत आहे. आज बाहेर परिस्थिती कशी ही असो याचा अर्थ कोणतेही काम थांबू शकत नाही, खरेदी थांबू शकत नाही आणि गृह सजावट देखील थांबू शकत नाही. खरेदीचा आनंद अधिक सुलभ करत शून्य संपर्कात शॉपिंग करणे आता शक्य झाले आहे. घरी बसुनच घरातील फर्निचर व सजावटीसाठी शॉपिंग करण्यासाठी क्रिएटिसिटी, पुणे यांनी आपला ऑनलाइन मंच www.creaticityonline.com सुरू केला आहे. जिथे प्रत्यक्ष मॉल हा डिजिटल रुपात पहावयास मिळेल, केवळ फर्निचर, होम डेकोर आणि होम स्टाईलिंग साठी ही डिजीटल सुविधा पुणेकरांसाठी उपलब्ध आहे.

या नाविन्यपूर्ण लॉन्चच्या पार्श्वभूमीवर अपर्णा पिरामल राजे – स्तंभलेखक व लेखक, गणेश नटराजन,-अध्यक्ष-५ एफ वर्ल्ड अँड पुणे सिटी कनेक्ट, गोविंद श्रीखंडे -मार्गदर्शक आणि माजी एमडी शॉपर्स स्टॉप आणि प्रताप जाधव-तत्कालीन भूतपूर्व अध्यक्ष -इन्स्टीट्युट ऑफ इंडियन इंटिरियर डिझाइनर्स.हे मुख्य अतिथी म्हणुन उपस्थित होते.
या ई-कॉम लॉन्चचे आयोजन महेश.एम- सीईओ,क्रिएटिसिटी यांनी केले होते. लाँच दरम्यान बोलताना ते म्हणाले, “ गेल्या दोन वर्षांपासून तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा जागरूक प्रयत्न आम्ही केला, आणि याचे दोन टप्पे सफलतापुर्वक गाठले. ज्यात इंटरॅक्टिव टच, कियॉस्क, बीकन-बेस सोल्यूशन्स आणि ग्राहकांना अधिक चांगली सुविधा प्रदान करणारे माहितीवर आधारित मोबाइल अॅप सारख्या टेक्नो-मेलिंग उपक्रमांचा समावेश होता, जो प्रत्यक्ष मॉलसह तंत्रज्ञानाची सांगड घालतो. ते पुढे म्हणाले की, हा अनुभव प्रत्यक्ष अनुभवाइतकाच खराखुरा आहे. ई-कॉम उपक्रम आमच्या ग्राहकांना अखंड खरेदी अनुभव देण्यासाठी आम्हाला आणखी एक पाऊल पुढे नेतो, जिथे तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्ष समाकलन करता येते ” ते पुढे म्हणाले की, “यात ग्राहकांना आता उत्पादनांचा स्पर्श अनुभवता येतो आणि आरामादायी सुविधा युक्त खरेदी सोबतच विक्रेत्यांकडुन सल्ला देखील डिजीटल स्वरुपात घेता येईल.
आज आपण सर्वच जीवनास नवीन दृष्टीकोनातून सामोरे जात आहोत आणि याचवेळी आपल्याला ठामपणे जाणवते की घर ते आहे जिथे आपले हद्य आहे जिथे आपण काम करतो / खातो / खेळतो / जिथे आज पूर्वीपेक्षा अधिक घडामोडी घडतात तेच आपले घर.४००० उत्पादने, २०उत्पादनांच्या श्रेणी आणि ४० ब्रांड्सची सुरूवात करणार्या या ई-कॉमर्स पोर्टलने ब्रँड /विक्रेते यांचे उत्तम संयोजन केले आहे. होम डेकोर श्रेणीतील हे ई-कॉमर्स पोर्टल ही भारतातील पहिलीच अनोखी संकल्पना आहे.
या पोर्टलद्वारे क्रिएटिसिटी मध्ये बरेचसे ब्रॅंड पहावयास मिळतील.याचसोबत फर्निचर आणि होम डेकोर स्पेसमधील अनेक नामांकित राष्ट्रीय आणि प्रादेशिक ब्रांड देखील येथे आहेत.
या पोर्टलद्वारे ग्राहक प्रत्यक्ष उपस्थित राहण्याच अनुभव घेत प्रत्येक स्टोअरला वैयक्तीक भेट देऊ शकतो. व्हिज्युअलायझेशनचे बारीक तपशील तपासण्यासाठी विशिष्ट उत्पादनास झूम करण्याचे पर्याय ,भेटी द्वारे लाइव्ह चॅट , व्हिडीओ कॉल ,सोपे ब्राउझिंग, उत्पादकांना ऑर्डर देण्याबाबत सल्ला,विक्रेत्याशी व्हिडीओ सल्लामसलत आदि पर्याय देखील येथे उपलब्ध आहेत.सीईओ महेश पुढे म्हणाले, संपूर्णपणे स्वच्छ केलेल्या वातावरणामध्ये उत्पादनांना स्पर्श करणे, अनुभवणे , किरकोळ विक्रेत्यांशी वैयक्तिकरित्या संवाद साधणे, घरांना आरामदायक, सुंदर निवासस्थान बनविण्यासाठी ग्राहक येथे येऊन प्रत्यक्ष निवड देखील करु शकतात.
जर ग्राहक उत्सव आणि विशेष प्रसंगासाठी घरे सजवण्यासाठी व आपल्या प्रियजनांसाठी भेटवस्तू खरेदी करू इच्छित असतील तर घरातच सुरक्षित बसून आमच्या ईकॉमर्स पोर्टलला भेट द्या आणि आपल्याला हवे ते खरेदी करा. लहान टेबल लॅम्प पासुन ते सोफा सेट, डायनिंग सेट किंवा वॉर्डरोबपर्यंत खरेदी करायाचा असेल तर आमचे ऑनलाइन तज्ञ आपल्या निवडी पासुन संपूर्ण प्रक्रिये मध्ये आपल्याला मदत करतील. क्रिएटिसिटी पुणे आपणास एक उत्कृष्ट ग्राहक अनुभव प्रदान करते.
क्रिएटिसिटीच्या नवे घोषवाक्य म्हणजेच अनुकुलता, सहानुभुती, नवेपणा, स्वताचे, सामंजस्य आणि एक उत्कृष्ट ग्राहक अनुभव प्रदान करने यात क्रिएटिसिटी प्रथमस्थानी आहे.
