Wednesday, June 17, 2026
NATIONAL

श्रीराम मंदिर संस्कृतीचे आधुनिक प्रतिक असेल : नरेंद्र मोदी

अयोध्या, दि. ५ – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे. पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभे राहणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.भूमिपूजन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. नरेंद्र मोदींनी यावेळी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभारी मानले.

राम मंदिराच्या टपाल तिकीटाचे ही मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले.आज प्रभू रामाचा जयघोष संपूर्ण जगभरात होत आहे असे सांगत मोदींनी सर्व नागरिकांना आणि जगभरात असलेल्या रामभक्तांना शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदींनी सियावर रामचंद्र की जय घोषणेने आपल्या भाषणाला सुरुवात केली.

संपूर्ण राम मंदिर भूमिपूजन सोहळा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading