Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENT

‘वैजू नंबर वन’ मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग

स्टार प्रवाहवरील वैजू नंबर वन मालिकेत रक्षाबंधन विशेष भाग पहायला मिळणार आहे. प्रत्येक प्रॉब्लेमला हटके सोल्यूशन शोधणाऱ्या वैजूला मालिकेत भाऊ नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी तिला याची उणीव भासत असते आणि ती देवाला मला भाऊ मिळावा अशी प्रार्थना करते. योगायोगाने रक्षाबंधनाच्या दिवशी वैजूच्या घरात एक चोर घुसतो आणि देवाने कौल दिला या आनंदात वैजू या चोरालाच आपला भाऊ मानून त्याला ओवाळते. तिसरी मंझिलच्या चाळकऱ्यांच्या लक्षात जेव्हा ही गोष्ट येते तेव्हा नेमका काय गोंधळ उडतो आणि वैजू यातून कसा मार्ग काढते याची मजेशीर गोष्ट वैजू नंबर वनच्या रक्षाबंधन विशेष भागात पाहायला मिळणार आहे.

वैजू नंबर वन या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्याच्या तणावाच्या या वातावरणात मालिकेतले हलकेफुलके विनोद प्रेक्षकांची भरभरुन दाद मिळवत आहेत. तिसरी मंझिल चाळीतलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलसं वाटू लागलं आहे. त्यामुळेच वैजू नंबर वनच्या प्रत्येक भागात कोणती नवी धमाल घडणार याची उत्सुकता असते. मनोरंनाने परिपूर्ण असे वैजू नंबर वनचे नवनवे भाग पाहायला विसरु नका सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading